आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drainage Line Water, Latest News In Divya Marathi

‘पवननगरमधील धोकादायक ड्रेनेजवर ढापा बसवा’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वॉर्ड क्रमांक 18, पवननगर परिसरातील जैन मंदिरापासून बळीराम पाटील हायस्कूलकडे जाणा-या मुख्य रस्त्याजवळ सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाला तयार करण्यात आला आहे; परंतु या नाल्यातून सांडपाण्याऐवजी ड्रेनेजलाइनचे पाणी वाहू लागले आहे. नाल्यावर ढापे बसवण्यात आलेले नसल्याने धोकादायक बनले आहे.
नागरिकांनी उघड्या नाल्याच्या काठावर दगड लावले आहेत. नागरिकांच्या कॉम्प्लेक्ससमोरील भागात पार्किंगला जागा राहिलेली नाही. विना ढाप्यामुळे रात्रीच्या वेळी जीवितहानी होऊ शकते. याबरोबरच ड्रेनेजलाइनचे पाणी सोडण्यात आल्यामुळे दुर्गंधी पसरलेली आहे. या समस्येमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झालेले असून मनपा अधिकारी, नगरसेवकांनी याकडे लक्ष द्यावे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

जैन मंदिराजवळ असलेल्या रस्त्यालगतच्या नाल्यावर ढापे बसवण्यात आलेले नाहीत. धोकादायक ठिकाणी संबंधित मनपा कर्मचा-यांना पाठवून पाहणी करण्यात येईल.- एस. एल. पवार, वॉर्ड अभियंता