आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदिरानगर बायजीपु-यात दोन महिन्यांपासून तुंबले घरांसमोर ड्रेनेजचे पाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वॉर्ड क्रमांक ५२ इंदिरानगर, बायजीपुरा भागात असलेल्या गल्ली नं.२ मध्ये दोन महिन्यांपासून नागरिकांच्या घरासमोर ड्रेनेजचे पाणी साचले आहे. ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या घरासमोर साचल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गल्ल्लीत नागरिकांना जाण्या-येण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे. ड्रेनेजच्या पाण्यातून नागरिकांना जा - ये करावी लागत आहे.

बायजीपुऱ्यातील गल्ली नं.२ मध्ये ड्रेनेजच्या दुर्गंधीमुळे लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. या संदर्भात वारंवार सांगूनही मनपा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. या गल्लीत १४ घरे असून जाण्या-येण्यासाठी रस्ता राहिलेला नाही, मुलांना खेळण्यासाठी जागा नाही. घरासमोर ड्रेनेजलाइनच्या पाण्याचे तळे साचलेले आहे. नगरसेवकही लक्ष देत नाही. ही समस्या तत्काळ सोडविण्यात यावी, अशी मागणी भानुदास मोटे, अब्दुल जाकेर अब्दुल गफूर खान आदींनी केली आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा काय म्‍हणाताज जबाबदार...