आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर; २५ घरांना दुर्गंधीचा त्रास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - वॉर्ड क्रमांक ५२, इंदिरानगर बायजीपुरा भागातील गल्ली नं. ३ मध्ये अडीच वर्षांपूर्वी टाकण्यात आलेली ड्रेनेजलाइन वारंवार तुबंत आहे. यामुळे २० ते २५ घरांना दुर्गंधीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. दिवसभर दुर्गंधी पसरलेली असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मालमत्ता कर भरूनही या वॉर्डाचा विकास रखडला आहे. पाच वर्षांपासून रस्त्याचे डांबरीकरण न झाल्यामुळे पावसाळ्यात सर्वत्र चिखल होत आहे. एवढेच नव्हे, तर रस्त्याच्या मध्यभागी ड्रेनेजचे ढापे बसवण्यात आलेले असून अर्धा इंच वर आलेले आहेत. त्यामुळे तीन चाकी अॉटोरिक्षासुद्धा जाऊ शकत नाही. चेंबरच्या ढाप्यामुळे रात्रीच्या वेळी दुचाकीस्वार अपघात होऊन पडत आहेत. याबाबत नगरसेवकांना सांगूनही याकडे लक्ष दिले जात नाही. सदरील ड्रेनेजलाइन बदलण्यात यावी, ढापेची उंची कमी करावी, अशी मागणी शेख अफसर नवाब, अख्तर बागवान, आबेद खान, नासेर खान आदींनी केली.
जुनी ड्रेनेजलाइन तत्काळ बदलण्याची मागणी
वारंवार ड्रेनेज तुंबत असल्यामुळे दुर्गंधी पसरत आहे.त्यामुळे आरोग्य जुनी ड्रेनेजलाइन बदलण्यात यावी.

विजय सोनवणे, रहिवासी
दोन दिवसांआड ड्रेनेजलाइन चोकअप होऊन दुर्गंधीयुक्त पाणी घरात पाझरत आहे. लहान मुलेही आजारी पडत असून याकडे तत्काळ लक्ष द्यावे.
आबेद खान, रहिवासी
ड्रेनेच्या दुर्गंधीमुळे आमची मुले आजारी पडत आहेत. दिवसभर घाणीची दुर्गंधी पसरली आहे. बाहेरही बसू वाटत नाही. ड्रेनेज वारंवार तुंबत आहे.
इंदिरा सोनवणे, रहिवासी