आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रेनेजलाइनचे काम पंधरा दिवसांपासून रखडले, रस्त्याची दुरवस्था

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वॉर्डक्रमांक मयूर पार्क भागातील उद्यानापासून ते मारुती मंदिरापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. यातच ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी डांबरीकरण झालेला रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे पाऊस आल्यानंतर संपूर्ण रस्ता चिखलमय होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून ड्रेनेजलाइनचे काम बंद स्थितीत असल्याने नागरिकांना जाण्या-येण्यासाठी त्रास होत आहे.
मयूर पार्क परिसरात हजार ७५० लोक राहत आहेत. कार्तिकीनगर, धनश्री कॉलनी, मारुतीनगर, साईनगर, रामेश्वरनगर या भागातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मारुती मंदिराच्या बाजूस असलेल्या रस्त्यावर ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी खड्डा खोदण्यात आला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून हे काम बंद स्थितीत आहे. यामुळे वाहने येण्या-जाण्यासाठी अडचणीचा रस्ता ठरत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, ड्रेनेजलाइनचे काम तत्काळ करण्यात यावे,यासाठी मयूर पार्क नागरी कृती समितीच्या वतीने वारंवार निवेदन देऊनही याकडे नगरसेवक लक्ष देत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
डांबरीकरण झालेले असताना रस्ता खोदून ठेवल्याने चिखल होत आहे. काम होणे आवश्यक आहे. ललितसरदेशपांडे, रहिवासी

मागील पंधरा दिवसांपासून ड्रेनेजलाइनचे काम बंद पडलेले आहे. वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. आशिषइंगळे, रहिवासी

वारंवार निवेदन देऊनही रस्त्याचे डांबरीकरण होत नाही. ज्योतीपाटील, रहिवासी

ड्रेनेजलाइनच्या कामामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याकडे नगरसेवकांनी वॉर्डातील समस्यांकडे लक्ष द्यावे. सुनीतापाटील, रहिवासी

ड्रेनेजलाइनचे काम पूर्ण करणार
रस्त्याचेकाम येणाऱ्या बजेटमध्ये ठेवण्यात आलेले आहे. त्यापूर्वी ड्रेनेजलाइनचे काम सुरू आहे. पाठीमागील बाजूस लाइन चोकअप असून ती सुरळीत करण्यात येत आहे. त्यानंतर मुख्य रस्त्यावरचे ड्रेनेजलाइनचे काम केले जाईल. विजयऔताडे, नगरसेवक