आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drainage Works Problem Issue At Gandhinagar, Divya Marathi,

गांधीनगरातील समस्या सोडवण्यास मनपा उदासीन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वॉर्ड क्रमांक 38, गांधीनगर भागातील जाफर गेटकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावर काही महिन्यांपासून ड्रेनेजलाइन फुटली आहे. त्यातून दुर्गंधीयुक्त पाणी, मलबा उघड्या नाल्यात जात आहे. ड्रेनेजलाइन फुटीमुळे दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. कचर्‍याचे ढीग जागोजागी साचले आहेत. याबाबत मनपा अधिकार्‍यांना वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले जात आहे.

वॉर्डात जागोजागी चार ते पाच दिवस कचरा तसाच पडून असतो. सडलेल्या कचर्‍यातून जीवजंतूचा प्रसार होत आहे. परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी आणि नगरसेवकांनी केला आहे. मनपा अधिकार्‍यांचे विकासाच्या बाबतीत असणारे उदासीन धोरण समोर येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वॉर्डात ठिकठिकाणी गटारी तुंबलेल्या आहेत. याबरोबरच बहादूरपुर्‍यात नागरिकांना पाण्याची टंचाई भासत आहे. नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाणी प्यावे लागत आहे.
काय म्हणतात नागरिक ?
जलवाहिनी फुटलेली असल्याने चोवीस तास पाणी वाया जात आहे. परंतु अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. भीमराव चाबुकस्वार, रहिवासी

वॉर्डात ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिगारे साचलेले आहेत. ड्रेनेजलाइन फुटलेली आहे. याकडे लक्ष देऊन कचरा उचलण्यात यावा. जब्बार पठाण, रहिवासी

अभिनय, अभिनीत टॉकीजकडून कैलास स्मशानभूमीकडे जाणार्‍या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे.कर्मचारी नाल्याची सफाई करत नसल्याने मजूर लावून आम्ही स्वत: सफाई करून घेत आहोत. अधिकार्‍यांनी याकडे लक्ष द्यावे. बाळू पटेल, रहिवासी