औरंगाबाद- युद्ध कोणत्याही राज्यकर्त्यांमध्ये झाले तरी त्यात सामान्य माणूसच भरडला जातो, हे वैश्विक सत्य अडीच हजार वर्षांपूर्वी ग्रीक नाटककार इस्किलसने 'अॅगमेमनॉन' नाटकात मांडले. मांडणी, भाषाशैली, नेपथ्य, वेशभूषा अशी अनेक आव्हाने असलेल्या या नाटकाचे इंग्रजी रंगभूमीवर अनेक प्रयोग झाले. आता हे शिवधनुष्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.शशिकांत ब-हामपूरकर आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी पेलण्याचे ठरवले आहे. डॉ. रा.वि. पवार यांनी हिंदीमध्ये अनुवादित केलेल्या या नाटकाचा प्रयोग ५, ६ सप्टेंबरला विद्यापीठाच्या नाट्यगृहात सायंकाळी साडेसात वाजता होणार आहे.
यात नंदू भुरेने 'अॅगमेमनॉन', कल्पना कचकुरेने क्लायटेमिनिष्ट्रा, प्रियंका उबाळेने इफेजिनियाची भूमिका केली आहे. याशिवाय अस्लाम शेख, संदीप पाटील, प्रदीप कांबळे, रावसाहेब गजमल, विशाखा शिरवाडकर यांच्याही भूमिका आहेत. कोरसमध्ये अमोल अढाऊ, गजेंद्र घायवट, राजेश्वर देवरे, शेखर तुमडे आहेत. संगीत भरत जाधव, चरण जाधव, रामदास धुमाळे तर नेपथ्य अमोल अढाऊ, रंगभूषा प्रा स्मिता साबळे, श्वेता मांडे, वेशभूषा राहुल बोरडे यांची आहे. डॉ. जयवंत शेवतेकर, अशोक बंडगर, स्मिता साबळे, वैशाली बोदेले, गजानन दांडगे, सौम्याश्री पवार, वैजनाथ राठोड यांनी इतर साहाय्य केले आहे. गेले चार महिने तालमी करत विद्यार्थ्यांनी या प्रयोगाची निर्मिती केली आहे. त्याला दाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. बऱ्हाणपूरकर यांनी केले आहे.