आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रांच्या कलादालनातून उभे केले ‘प्रयोगशील ज्ञानमंदिर’,

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केवळ पुस्तकी शिक्षण देण्यापेक्षा मुलांमध्ये बहुविध कलांची गोडी निर्माण करावी. त्या माध्यमातून त्यांची सृजनशीलता वाढीस लागावी यासाठी गंगापूर तालुक्यातील एका गावाच्या जि. प. शाळेचे शिक्षक मनापासून प्रयत्न करत आहेत. या शाळेतील चित्रकला शिक्षकाने मुलांना चित्रकला शिकवली. त्याच्या स्पर्धा घेतल्या आणि त्यातील निवडक चित्रांचे स्वतंत्र कलादालन उभारले. एवढेच नव्हे, तर शाळेच्या भिंतींवरही सुंदर चित्रे काढून त्यातून विज्ञान, भूगोलाच्या संकल्पना, पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगितले. खऱ्या अर्थाने ‘प्रयोगशील शाळा’ करून या ज्ञानमंदिराला नव्या उंचीवर नेले आहे. पंचक्रोशीतील लोक येथील हे अभिनव कलादालन पाहायला येतात, यातच सारे आले.... 
 
गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा हे छोटेसे गाव. येथेच जिल्हा परिषदेची प्राथमिक माध्यमिक शाळा आहे. शाळेचे कलाशिक्षक सचिन भोरे यांनी सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांमध्ये चित्रकला रुजवली. त्यांच्यात कलेकडे पाहण्याची, आस्वाद घेण्याची तिचे रसग्रहण करण्याची दृष्टी निर्माण केली. त्यामुळे येथील प्राथमिक माध्यमिकचे विद्यार्थी सुंदर चित्रे काढायला शिकले आहेत.
 
 
त्यांचे कौतुक व्हावे, म्हणून चित्रकला स्पर्धा घेण्याचा पायंडा पाडला. यातूनच जमा झालेल्या अनेक चित्रांचे कलादालन का उभारण्यात येऊ नये, असा प्रश्न मुख्याध्यापक शिक्षकांना पडला आणि त्यांनी लगेच त्यादृष्टीने तयारी सुरू केली. शाळेतीलच एका खोलीमध्ये हे दालन सुरू केले. सचिन भोरे, सुखदेव जाधव आणि राजेश जाधव यांनी चित्रकला स्पर्धेतील निवडक चित्रांचे प्रदर्शन कलादालनामध्ये लावले आहे. 
 
भिंती बोलक्या केल्या : शाळेतीलशिक्षकांनी कलादालन सुरू तर केले, परंतु शाळा परिसरातील भिंतींनाही बोलके केले. प्रत्येक भिंतींवर सुंदर चित्रे रेखाटण्यात आली आहेत. त्यामध्ये मासळी, कुत्रा, निसर्ग, झाडे, कार्टून इत्यादी चित्रांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या चित्रांच्या माध्यमातून ‘झाडे लावा झाडे जगवा’, ‘पाणी वाचवा’ इत्यादी संदेशही देण्यात आले आहेत.
 
जोडीलाच विज्ञान, भूगोल आणि खगोलशास्रातील विविध संकल्पना चित्रांच्या माध्यमातून सहज कळतील अशी चित्रे रेखाटली आहेत. चित्रांमुळे अतिशय सोप्या पद्धतीने मुलांना या अवघड संकल्पना समजायला लागल्या आहेत. शाळेला भेट देणारा प्रत्येक जण ही चित्रे पाहून शाळेचे, मुलांचे आणि त्यांना शिकवणाऱ्या येथील शिक्षकांचे कौतुक करतो. 
 
पुढील स्लाईडवर सविस्तर बातमी आणि फोटो पाहा.... 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...