आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रकला स्पर्धा: बालचित्रकारांनी रेखाटले भावविश्व

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- दि जळगाव पीपल्स को-ऑप. बॅँकेतर्फे रविवारी बहिणाबाई उद्यानात शालेय विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य खुल्या चित्रकला स्पर्धा झाली. दोन सत्रात झालेल्या या स्पध्रेत बालचित्रकारांनी चित्राच्या माध्यमातून भावविश्व रेखाटले. विशेष म्हणजे, या स्पध्रेचे उद्घाटन बालचित्रकार ऋचा महानोर हिच्या हस्ते करण्यात आले.

शहरासह जिल्ह्यातील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी या स्पध्रेत सहभाग घेतला. सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांनी चित्रे रंगवली. या वेळी बॅँकेचे व्हाइस चेअरमन शिवनारायण झंवर, संचालक दुर्गादास नेवे, सुनील पाटील, सुरेखा चौधरी, ज्योती सराफ, हरी पाटील, कार्यकारी संचालक अनिल पाटकर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी योगेश सुतार म्हणाले की, विद्यार्थ्यांनी चित्र काढण्यासाठी एकत्र यावे यासाठी एखाद्या बॅँकेने पुढाकार घेणे विशेष आहे. अशा प्रकारच्या उपक्रमातून हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात रंग भरता येतो. तसेच संचालक दुर्गादास नेवे यांनी बॅँकेने आजतागायत राबवलेल्या सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

उज्ज्वल इंग्लिश स्कूलच्या संचालिका अनघा गगडाणी आणि कन्याशाळेच्या कलाशिक्षिका मधुवंती देशमुख यांनीही चित्रकला स्पध्रेवेळी उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक केले. दरम्यान, या स्पध्रेच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेली बालचित्रकार ऋचा महानोर हिने काढलेली चित्रे ‘अजिंठा’ चित्रपटात ‘पारो’ व ‘रॉबर्ट गिल’ यांची भूमिका वठवणार्‍या कलावंतांनी आग्रहाने मागून घेतली. नीता वारूळकर यांनी सूत्रसंचालन केले.