आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drainage Line Cleaning Issue In Aurangabad City People Panic For His Health

स्वच्छता : औरंगाबादमधील सिद्धार्थनगरात डेंग्यू होण्याची शक्यता वाढल्याने नागरिकांमध्ये भीती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सिद्धार्थनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या बाजूला असणाऱ्या गल्लीत नाल्या तुंबल्या आहेत. सफाई कर्मचारी येत नसल्यामुळे नाल्याची सफाई करण्यात आलेली नाही. यामुळे चार महिन्यांपासून नाल्यातून वाहून जाणारे सांडपाणी तुंबले आहेत.
त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या घाण पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढत असल्याने डेंग्यू होण्याची शक्यता वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सिद्धार्थनगरात अनेक समस्या वाढल्या असून ठिकठिकाणी अस्वच्छता पसरली आहे. तुंबलेल्या नाल्याचे घाण पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वाढती दुर्गंधी आणि डासांचे वाढते प्रमाण यातून नागरिकांची कधी सुटका होईल, याची प्रतीक्षा नागरिक करीत आहेत. दहा ते बारा घरांना यामुळे त्रास होत आहे. यासंदर्भात नगरसेवकांना सांगूनही दुर्लक्ष होत आहे. वारंवार सांगूनही नालीचे चोकअप काढण्यात येत नसल्याचे गौतम डेरे, गणेश चव्हाण, सहदेव साळवे, संदीप दाभाडे, उषा डेरे, सुमन दाभाडे, पद्मा हिवाळे, अनिता साळवे, विमल सूर्यवंशी, छाया वाटोरे, कासाबाई धनराज आदींनी सांगितले.

दिव्य मराठी हेल्प लाइन - तुमच्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. त्यासाठी आमच्या प्रतिनिधींना ९७६५०७०३३३, ९०२८०४५१९९ या मोबाइल क्रमांकांवर समस्या कळवा.