औरंगाबाद - ड्रिलमशीन अंगावर पडल्याने गंभीर जखमी झालेल्या तीन वर्षांच्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान घाटीत गुरुवारी रात्री मृत्यू झाला. नाजिम जमिल शेख (अंबर हिल, हर्सूल) असे या बालकाचे नाव आहे. नाजिम १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घरात खेळत असताना अचानक अंगावर ड्रिल मशीन पडल्याने गंभीर झाला होता. त्याला प्रथम खासगी रुग्णालयात दाखल केले होते. २० फेब्रुवारी रोजी सकाळी त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने घाटीत दाखल केले होते. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.