आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला आत्महत्येचा ‘डेमो’ दाखवला; मद्यपी घाटीत !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मुकुंदवाडीच्या संघर्षनगरातील मजुराने मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास दारूच्या नशेत पत्नीला आत्महत्येचा ‘डेमो’ करून दाखवला. दादाराव पांडुरंग निकाळजे (35) असे या मजुराचे नाव असून सध्या तो घाटीत उपचार घेत आहे.

संघर्षनगरात एका पत्र्याच्या खोलीत पत्नीसह राहणारा दादाराव निकाळजे हा मजूर रात्री दारूच्या तर्र्र होऊन घरी परतला. पत्नी लक्ष्मीला जेवणाचे ताट वाढायला सांगितले. याच वेळी त्याने गमतीत पत्नीला आत्महत्या कशी करतात हे तुला माहीत आहे का? अशी विचारणा केली. तेव्हा तिने दादारावच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि काही कामानिमित्त ती घराबाहेर गेली. मात्र, याचदरम्यान दादारावने एका लोखंडी डब्यावर उभे राहत छताच्या लाकडी दांड्याला दोरी अडकवली आणि गळफास घेत डबा पायाने बाजूला सरकवला. तेवढय़ात लक्ष्मी घरात आली. हा प्रकार पाहून तिने दादारावचे दोन्ही पाय धरून उंचावत आरडाओरड केली. यानंतर शेजार्‍यांनी धाव घेऊन दादारावला खाली उतरवले. त्यानंतर लक्ष्मीने दादारावला घाटीत दाखल केले. दादारावची प्रकृती ठणठणीत असून या घटनेची नोंद मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.