आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डांबून ठेवलेल्या मद्यपी युवकाचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - सतत दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या युवकाला नेहमीच डांबून ठेवले जात होते. अतिमद्यप्राशनामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास नवा मोंढा लक्कड गल्ली येथे घडली. इनायत हारुण अली (२४) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.
मद्यप्राशन केल्यानंतर इनायत कोणाचेही ऐकत नसे. गल्लीत धिंगाणा करत असल्याने त्याचे भाऊ व वडील त्याला घरातील खोलीत हातपाय बांधून ठेवत होते. रविवारी रात्री नऊच्या सुमारास अतिमद्यप्राशन करून त्याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दररोजप्रमाणे जोरजोरात ओरडत असेल, असा समज झाल्याने त्याच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. रात्री १२ वाजेच्या सुमारास बांधलेले हातपाय सोडवण्यासाठी खोलीत गेलेल्या कुटुंबीयांना तो बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला तत्काळ घाटीत दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. इनायत हा लहान होता. त्याला एक मोठा भाऊ आहे. त्याच्या कुटुंबीयांचे किराणा दुकान आहे. त्याला एक वर्षाचे अपत्य आहे. मूळ गावी भोकरदन येथे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. क्रांती चौक पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.
कोंडणे, मारणे उपाय नाही
व्यसनाधीन लोकांना कोंडणे, मारहाण करणे हा व्यसन सोडवण्याचा उपाय असू शकत नाही. याबाबत अल्कोहोलिक्स अॅनॉनिमससारख्या संस्थेशी संपर्क साधल्यास व्यसन सोडवण्यासाठी मोफत मार्गदर्शन केले जाते.
बी. सुधीर, सभासद समन्वय, अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस.