आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊचचे थंडगार पाणी पिण्‍याआधी, जाणून घ्‍या या महत्‍त्वपूर्ण बाबी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - चांगल्‍याच कडाक्‍याच्‍या उन्‍हाला सुरूवात झाल्‍याने तहान भागवण्‍यासाठी पाण्याचे पाऊच विकत घेणे नागरिक पसंत करतात. मात्र, अशा पाऊचमध्ये दीर्घकाळ साठवलेले पाणी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, अशी तज्‍ज्ञांची मतं आहेत.
बाहेर मिळणारे दुषित पाणी पिण्‍यापेक्षा कुणीही पाणी पाऊच किंवा पाण्‍याच्‍या बाटलीचा पर्याय निवडतो. शहरातील बसस्थानक, पानटपऱ्या, उपाहारगृह, चित्रपटगृहासह गर्दीच्या ठिकाणी पाण्याच्या पाऊचची सर्रास विक्री होत असते. शिवाय बाटलीसाठी 20 रुपये खर्च केल्‍यापेक्षा बहुतेक जण 3 रुपया पाणी पाऊच घेणे पसंत करतात. अडीच ते तीन रुपये किंमतीच्‍या पाऊचचा पर्याय बहुतेक जण पसंत करतात. मात्र पाकिटातील पाण्याचा मोह हा विविध आजारांना आमंत्रण देऊ शकतो.
पाण्‍याला येतो प्‍लास्‍टीकचा गंध....
पाण्‍याची प्‍लास्‍टीक पाकिटात पॅकिंग केल्‍यानंतर पाकिटांच्‍या वाहतूकीला सुरूवात होते. काही विक्रेते जाहीरातीसाठी उन्‍हातच पाऊच ठेवतात. प्‍लास्‍टीक पिशवी उन्‍हामुळे गरम झाल्‍याने पाण्‍यालाही प्‍लास्‍टिकचा दुर्गंध लागतो. असे पाणी विविध आजारांना निमंत्रण देण्‍यास कारणीभूत ठरू शकते. प्लास्टिकचा गंध येत असल्याने ते प्यावेसे वाटत नाही.
( संग्रहातील सर्व फोटो केवळ सादरीकरणासाठी वापरलेले आहेत. )
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, पाणी पाऊच घेताना याबाबत घ्‍यावी दक्षता....