आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष: ‘डबाबंद प्रश्नां’नी केली न्यूनगंडावर मात!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आकलन क्षमता चांगली असूनही अनेकदा शाळेतील मुलांत न्यूनगंड असतो. एखादा विषय नीट कळला नाही तरी त्यावर शिक्षकांना प्रश्न विचारण्याचे धाडस नसते. अशा मुलांमध्ये प्रश्न विचारण्याचे सामर्थ्य वाढवण्याचा अभिनव उपक्रम आपतगावच्या (बीड रोड, ता. औरंगाबाद ) जिल्हा परिषद शाळेत सुरू आहे. पहिली ते सातवीचे सुमारे २० विद्यार्थी दररोज त्यांचे प्रश्न मांडून शंका निरसन करून घेत आहेत. जून २०१४ मध्ये या शाळेत संगीता निकम रुजू झाल्या. आपण शिकवतो ते विद्यार्थ्यांना कळते की नाही, यासाठी त्यांनी विचारणा सुरू केली. मुले शंका, प्रश्न विचारण्यासाठी उत्सुक नाहीत, असे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी डबाबंद प्रश्नांचा ‘विचारा तुम्ही, सांगतो आम्ही’ हा प्रयोग सुरू केला.

असा प्रयोग
मुख्याध्यापकांच्या दालनाबाहेर एक डबा ठेवला आहे. त्यात शाळा संपल्यावर किंवा मधल्या सुटीत मुलांनी त्यांचा प्रश्न लिहून टाकायचा. दुस-या दिवशी शिक्षक प्रश्न वाचतात आणि त्याचे सविस्तर उत्तर देतात. शिवाय प्रश्नांच्या अनुषंगाने इतर माहितीही देतात. शंकांचे निरसन करतात.

विद्यार्थ्यांचे शिक्षकांना थेट प्रश्न विचारण्याचे धारिष्ट वाढले
या प्रयोगाची राज्य प्रकल्प संचालक डॉ. सुवर्णा खरात, विशेष कार्यकारी अधिकारी प्राची साठे यांनी पाहणी केली. त्यांनी हा प्रयोग उत्कृष्ट असून राज्यातील इतर शाळांमध्ये राबवण्याचा विचार करू, असे सांिगतले. राज्य शिक्षण संचालनालय अशा नावीन्यपूर्ण प्रयोगांची माहिती घेत असल्याचेही त्यांनी सांिगतले. मात्र, केवळ लेखी प्रश्नांपुरते मुलांनी थांबू नये. शिक्षकांना थेट वर्गात प्रश्न विचारण्याचा प्रयत्न त्यांनी करावा, अशी पावले उचलली जात असल्याचे गटशिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील, शिक्षण

विस्तार अधिकारी आर. व्ही. ठाकूर यांनी सांगितले.
प्रयोगाचा असाही फायदा : मुले केवळ प्रश्नच विचारत नाहीत तर मित्र-मैत्रिणींविषयी माहितीही देतात. त्यातूनच तिसरीतील प्रणाली शिरसाटने कविता लिहिल्याचे शिक्षकांना कळले. तिच्या कवितांचा संग्रह शाळेने तिच्या वाढदिवशी प्रकाशित केला.