आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थेंब थेंब पाणी गळतीवर तहान भागवताहेत महिला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- गेल्याचार वर्षांपासून तीव्र पाणी टंचाईच्या झळा सहन करणाऱ्या मराठवाड्यात यंदा चांगला पाऊस पडला. मात्र अनेक वर्षांनंतर पडलेल्या पावसाचे पाणी जमिनीत मुरल्याने बोअरवेल आदीला समाधानकारक पाणी आज घडीला उपलब्ध नाही, परिणामी उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाण्यासाठी भटकंती सुरू झालेली दिसत आहे. 
 
थेंब-थेंब पाणी आम्हाला मोलाचे.. 
बजाज विहारच्या भिंतीलगत सिडको प्रशासनाची पाण्याची पाइपलाइन जाते, त्या पाइपमधून होणारी थेंब-थेंब गळती येथे राहणाऱ्या २७ परिवाराची तहान भागवते. लगत असणारे अपार्टमेंट अनेकांनी प्रॉपर्टी म्हणून तर काहींनी भाडेकरू ठेवण्याच्या विचाराने खरेदी केले. याठिकाणी सिडको प्रशासन, ग्रामपंचायत अथवा एमआयडीसी प्रशासनाकडून पाण्याची कुठलीच सुविधा करण्यात आलेली नाही.
 
 बिल्डरकडून घेण्यात आलेला बोअर हिवाळ्यातच आटतो. अशा वेळी येथे राहणाऱ्या नागरिकांना टँकर किंवा पाइप गळतीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. उल्लेखनीय बाब अशी की, येथे राहणारे सर्वाधिक नागरिक हे ‘भाडेकरू’ आहेत.
 
 पोटाची खळगी भरणाऱ्यांना रोज विकत पाणी घेणे शक्य नसल्यामुळे तसेच कमी पैशात फ्लॅट उपलब्ध होत असल्यामुळे येथील नागरिक विनातक्रार येथे गेली अनेक वर्षांपासून याच गळतीच्या थेंब-थेंब’ पाण्यावर आपल्या कुटुंबीयांची तहान भागवताना गेली अनेक महिन्यांपासून दिसतात. 
 
बातम्या आणखी आहेत...