आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोळ्यावर दुष्काळाचे सावट, विहीरत पाणी उपसून बैलांना धुण्याची वेळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जिल्ह्यातयंदा सरासरीपेक्षा ५० टक्के कमी पर्जन्यमान झाल्यामुळे पोळ्यावर दुष्काळाचे सावट आहे. घामाचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या बैलांची शुक्रवारी खांदेमळणी-पूजा होती. नदी, प्रकल्पात पाणी नसल्याने शेतकऱ्यांना लाडक्या सर्जा-राजाला विहीर, बोअरवेलचे पाणी उपसून अंघोळ घालावी लागली.
अल निनोचा प्रभाव आणि हवामानातील अनपेक्षित बदल यामुळे मान्सून अत्यल्प बरसला. सुरुवात चांगली झाली, मात्र त्यानंतर पाच आठवडे पाऊस झाला नाही. मोठ्या खंडामुळे १२ लाख हेक्टरवरील खरीप पिके जळून गेली. २४ लाख हेक्टरमधील पिकांची वाढ झाली नसल्यामुळे उत्पादनात ७० ते ८० टक्के घट येणार आहे. तसा अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे. बहुतांश नद्या, छोटे-मोठे प्रकल्प कोरडेच आहेत. बोअरवेल, विहिरीतील पाण्यानेही तळ गाठला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील टंचाईग्रस्त गावांना १४०० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. रानात चारा नसल्यामुळे चारा छावण्यांत पशुधन जगवावे लागत आहे. या भीषण दुष्काळामुळे हजारो शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघणार नाही. पोळ्याच्या तोंडावर अशी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवली आहे. यामुळे पोळा कसा साजरा करावा, या विवंचनेत शेतकरी आहेत. गत पाच दिवसांपासून अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी लावली, पण हा पाऊस मोजक्याच ठिकाणी झाल्यामुळे पोळ्यावर दुष्काळाचे सावट आहे.

चिनीमातीच्या बैलांना अधिक मागणी
शेतीक्षेत्रात तंत्रज्ञानाचा (ट्रॅक्टर) वापर वाढला आहे. ट्रॅक्टर तंत्रज्ञानावरच मशागती, पेरणी ते शेतमाल साठवणुकीपर्यंत कामे केली जात असल्याने बैलांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. पोळा सण साजरा करण्यासाठी शहर ग्रामीण भागातील लोकांना चिनीमातीचे बैल खरेदी करावे लागत आहेत. त्यामुळे बाजारात चिनीमातीच्या बैलांना मागणी जास्त असल्याने १० ते २५० रुपये भाव मिळत आहे.

सर्जा-राजाला कमी पडू देणार नाही
^वर्षभरसर्जा-राजाच्या भरवशावर संसाराचा रहाटगाडा सुरू असतो. ऊन, वारा, पाऊस अशा कोणत्याही वेळी ते सुखदु:खाचे साक्षीदार असतात. त्यामुळे पोळ्याला आम्ही उपाशी राहू, पण सर्जा-राजाला कशाचीच उणीव भासू देणार नाही. संजयधोत्रे, शेतकरी.

दुष्काळाचे राजकारण जिवलगाबरोबर नाही
बैलांनामी जिवलग सखा मानतो. दुष्काळ पडला त्याला आपण काहीच करू शकत नाही. परिस्थितीला सर्वांनी एकत्रित येऊन तोंड दिले पाहिजे. दुष्काळाचे राजकारण जिवलगाबरोबर करणार नाही. उत्साहात पोळा साजरा व्हावा यासाठी प्रयत्न करू. सचिनसोळुंके, शेतकरी.