आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळ पथक शुक्रवारी पुन्हा मराठवाड्यामध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दुष्काळाचीपाहणी करण्यासाठी शुक्रवारपासून केंद्रीय दुष्काळ पथक मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहे.
राज्यात दहा अधिकाऱ्यांचे पथक गुरुवारी सायंकाळी दाखल होणार असून दोन पथके मराठवाड्यात तर उर्वरित एक पथक नगर- नाशिकसह राज्याच्या अन्य भागात पाहणी करणार आहे, असे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी सांगितले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केंद्रीय पथकाने मराठवाड्याचा दौरा केला होता. त्यानंतर राज्याला २१०० कोटींची मदत मिळाली होती. या वर्षीही मराठवाड्यात गंभीर परिस्थिती आहे.

दिल्लीचे फलोत्पादन आयुक्त एस.के. मल्होत्रा यांच्या नेतृत्वातील या पथकासमोर दुष्काळी स्थितीचे सादरीकरण केले जाणार आहे. दुष्काळी पथकाचा दौरा ठरल्यानंतर गावेदेखील प्रशासनाकडून ठरवण्यात येतात. मात्र या वेळी दौऱ्याचा मार्ग ठरल्यानंतर वाटेत असणाऱ्या गावांमध्ये जाऊन पथक पाहणी करणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष स्थितीदेखील पाहता येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...