आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूजमधील आठही प्रकल्प कोरडे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - पावसाळा लागून दोन महिने उलटल्यानंतरही वाळूज परिसरात पाऊस नाही. पावसाअभावी परिसरातील आठही धरणे व तलाव आटले आहेत.त्यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत. येणार्‍या पंधरा दिवसांत पाऊस न पडल्यास चारा-पाण्याचा प्रश्न भेडसावण्याची शक्यता आहे.

पावसाळा लागून दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र,परिसरात एकही पाऊस झालेला नाही.पावसाअभावी परिसरात कधी नव्हे एवढी गंभीर परिस्थिती यंदा निर्माण झाली आहे. परिसरातील आठपैकी सात तलाव व टेंभापुरी मध्यम प्रकल्प हे धरण जुलै महिन्याच्या प्रारंभीच कोरडे पडले आहे. परदेसवाडी लघुप्रकल्प, तिसगाव,घाणेगाव, शरणापूर, करोडी, साजापूर व वडगाव कोल्हाटी या तलावांमध्ये पाणीच शिल्लक नाही. लघुप्रकल्प, धरणे कोरडी पडल्यामुळे जनावरांना खाम नदीतील दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. काही तलावांच्या परिसरातून विविध गावांच्या पाणीपुरवठय़ाच्या योजना आहेत. तलावात पाणी नसल्याने या योजनाही अडचणीत येतील. परिणामी, परिसरात पाणीटंचाई उग्र रूप धारण करण्याची चिन्हे आहेत.