आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळाच्या झळा, मान्सून तोंडावर, तरीही बाजारपेठ थंड; कपाशी बियाणे, खते पडून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सततच्या दुष्काळामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी यंदा मान्सून तोंडावर आला असतानाही खरेदीला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट आहे. जिल्ह्यातील हजार ८४४ खते, बियाणे कीटकनाशके विक्रेत्यांकडे १३ लाख ७५ हजार कपाशी पाकिटे, लाख हजार ८२३ मेट्रिक टन रासायनिक खते, सोयाबीन, मूग, उडीद, मक्याचे १४ क्विंटल बियाणे पडून आहे.
कृषी प्रशासनाने खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांची परवड होऊ नये यासाठी बी-बियाणे खतांचे नियोजन करून ठेवले आहे. शेतीच्या मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. मराठवाड्यात मान्सून जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे. मात्र, शेतकऱ्यांनी बियाणे, खते खरेदीला सुरुवात केली नाही.
पहिले सावध पाऊल : सलगदुसऱ्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होण्याचा अंदाज असल्यामुळे हवामान बदल मान्सूनची स्थिती लक्षात घेऊन पिकांचे नियोजन करणे शक्य आहे. याचा विचार करून बळीराजाने पहिले सावध पाऊल टाकले आहे.
आर्थिक निकड : सततच्यादुष्काळामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. पीक कर्जही ते फेडू शकले नाहीत. यंदा कुणी कर्ज देण्यासही तयार नाही. बँका जुन्याच कर्जाचे पुनर्गठण करत आहेत. यात हाती काहीच उरत नसून जुन्या कर्जाचे नव्यात कर्जात रूपांतर होत आहे. खते, बियाणे खरेदीसाठी पैसे नाहीत. युरिया वगळता इतर सर्व खतांचे भाव सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. विविध बियाण्यांचे भावही परवडणारे नाहीत. उत्पादन खर्च वाढला आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, असा होणार परिणाम...
बातम्या आणखी आहेत...