आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - निरीक्षक नसल्यामुळे एजंटांकडूनच वाहनांची पासिंग करणारा अजब प्रकार सोमवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात पाहावयास मिळाला. सकाळी दहा वाजता योग्यता प्रमाणपत्र, नवीन गाड्यांचे रजिस्ट्रेशन, परमिट आदी कामांसाठी आलेल्या गाड्या दुपारी दोन वाजेपर्यंत कार्यालयाच्या परिसरात उभ्या होत्या. कार्यालयात दोन सहायक परिवहन अधिकारी असतानादेखील एजंटांनीच वाहनांची पासिंग केल्यामुळे कार्यकर्त्यांनी अधिकार्यांच्या रिकाम्या खुर्च्यांना हार घालून ‘गांधीगिरी’ केली.
कार्यालयाच्या परिसरात वाहनांची रांग वाढत होती. प्रत्येक जण सहायक परिवहन अधिकार्यांकडे जाऊन वाहनांची तपासणी करण्याची विनंती करत होता. ‘हे माझे काम नाही’ असे सांगून अधिकारी जबाबदारी ढकलण्याचे काम करत होते. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी लोकशाही दिनासाठी विभागीय कार्यालयात गेल्याचे कारण समोर केले जात होते.
संघटनांनी घातले रिकाम्या खुच्र्यांना हार : कार्यालयात आठ निरीक्षक कार्यरत आहेत, पण यापैकी एकही हजर नसल्यामुळे प्रगती वाहन चालक - मालक संघर्ष कृती समितीच्या सदस्यांनी निरीक्षकांच्या रिकाम्या खुच्र्यांना दरवाजाला पुष्पहार घातला. ‘मनमानी कारभाराचा निषेध असो’ अशी नारेबाजी केली.
हा गोंधळ पाहून सहायक परिवहन अधिकारी गणेश ढगळे यांनी वाहनांची तपासणी केली. दरम्यान, सहायक परिवहन अधिकारी अनिलकुमार बस्ते यांच्या दालनात विविध पक्ष, संघटनांच्या कार्यकर्त्यांची बैठक सुरू असल्याचा आरोपही या वेळी आंदोलनकर्त्यांनी केला.
विविध संस्था संघटनाचे कार्यकर्ते इतर दालनात न जाता कार्यालयीन समस्या घेऊन माझ्याकडे येतात. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देणे किंवा त्यांच्याशी चर्चाही करावीच लागते. माझ्या दालनात कुठल्याच प्रकारची बैठक सुरू नव्हती. निरीक्षक नसल्यामुळे कार्यालयात वाहनांची रांग लागली होती. त्या वेळी मी स्वत: सहायक परिवहन अधिकार्यांना गाड्या तपासण्याच्या सूचना केल्या. -अनिलकुमार बस्ते, सहायक परिवहन अधिकारी
दालनात बैठक झाली नाही
ज्या निरीक्षकांची सोमवारी ड्युटी होती ते उमरगा येथील चेकपोस्टवर होते. त्यांची ड्युटी दुपारी दोन वाजता संपते. त्यामुळे त्यांना वेळेवर येणे शक्य झाले नाही. मात्र, वाहनांचा वाढता ओघ पाहून स्वत: सहायक परिवहन अधिकार्यांनी त्या तपासल्या. राजेंद्र वर्मा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.