आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हयगय केल्यास थेट निलंबन करू, केंद्रीय पथकानंतर पालकमंत्री बबनराव लोणीकरांचा जम्बो दौरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - जिल्ह्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती असून शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या दरम्यान, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने काम करावे. जे कामात हयगय किंवा टाळाटाळ करतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल. ज्या बँका पीककर्ज वाटप पीक कर्जाचे पुनर्गठनाचे उद्दिष्ट दिवसांत आत पूर्ण करणार नाहीत, त्या बँकांचे परवाने रद्द करू असा इशारा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला.
अंबड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात अंबड घनसावंगी तालुक्यातील टंचाई संदर्भात आयोजित बैठकीत लोणीकर बोलत होते. आमदार नारायण कुचे, माजी आमदार विलास खरात, जिल्हा परिषद सदस्य सतीष टोपे, बप्पासाहेब गोल्डे, संजय काळबांडे, घनसावंगी पंचायत समिती सभापती प्रेमसिंग राठोड प्रमुख उपस्थिती होती. लोणीकर म्हणाले, नैसर्गिक आपत्तीत सरकारने दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्यात येईल, असा लेखी करार सर्व बँकांनी शासनासोबत केलेला असतो. दरम्यान, दुष्काळी परिस्थिती शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते-औषधींसाठी पैशाची गरज लक्षात घेऊन पीककर्ज वाटप पुनर्गठणाचे जिल्ह्यातील सर्व बँकांना उद्दिष्ट देण्यात आले आहे. सर्व बँकांनी दिलेले उद्दिष्ट येत्या दिवसात पूर्ण करावे. अन्यथा बॅँक परवाना रद्द करण्याबरोबरच कामचुकार बॅँक अधिकारी, कर्मचाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले.
अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांची पीके हातची गेली आहेत. अशा परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करण्याची गरज आहे. यापुढे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. नागरिकांना मुबलक पाणी मिळण्यासाठी शासनामार्फत टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. ज्या गावातून पाणी मागणी होईल त्या ठिकाणी तातडीने टँकर उपलब्ध करुन देण्यात यावे, असे निर्देशही लोणीकरांनी दिले.

मराठवाडा दौरा करणार
जिल्ह्यात६०-६२ बैठका घेतल्या आहे. दरम्यान, ग्रामविकास मंत्री पंकजा पालवे मी स्वत: मराठवाड्याचा दौरा करणार आहे. यात पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चाराछावण्या, अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी, जलसंधारणाची कामे, दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यासंदर्भात सर्व माहिती दौऱ्यातून संकलीत करू. मराठवाड्याला मदतीचे झुकते माप मिळेल.

घनसावंगी तालुका दौरा
घनसावंगी तालुक्यातील कुंभारपिंपळगाव येथील शेतकरी प्रल्हाद कंटुले यांच्या शेतात सोयाबीनची तर म.चिंचोली येथे आनसाबाई तौर यांच्या गट क्रमांक ३८३ मध्ये कापसाच्या पिकाची पाहणी केली.
२२.३८ मि.मी. पाऊस

जालनाजिल्ह्यात बुधवारी सकाळपर्यंत मागील २४ तासात २२.३८ मि.मी एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली. पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये तर कंसात एकूण पावसाची आकडे असे : जालना- २५.६३ (२५८.३९), बदनापूर- १६.८० (२१०.४०), भोकरदन- ५.१३ (३०४.१३), जाफ्राबाद- ७.२० (२३५.४०), परतूर- २६.६० (२६२.८०), मंठा- १८.५० (२५४.२५), अंबड- ४४.२९ (२४३.१५) घनसावंगी- ३४.८६ (२०३.००) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६८८.२१ मि.मी. एवढी असून जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात २४६.४४ मि.मी एवढा पाऊस झाला असून याची सरासरी ३५.८० टक्के एवढी आहे.

जिमस बॅँकेची स्थिती बिकट
जालनाजिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक स्थिती कमकूवत असल्यामुळे त्यांना दिलेले १३० कोटी रूपयांचे पीककर्ज वाटप होणार नाही. दरम्यान, बँक कर्ज वाटपाचा दावा करत असली तरी फक्त कर्जाचे नवे-जूने सुरू आहे (जुने पीककर्जाचे व्याज भरून घेऊन नुतनीकरण). मात्र, अन्य बँका पीककर्ज वाटप करत आहे. दरम्यान, आतापर्यंत ५५० कोटींचे पीककर्ज वाटप झाले असून उर्वरीत कर्ज वाटप तत्काळ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आजचा पालकमंत्र्यांचा दौरा
पालकमंत्रीगुरुवारी सकाळी वा. भक्तीनिवास येथून राजूरकडे प्रयाण. सकाळी १० वा. राजूर येथे आगमन पीक पाहणी. ११ वा. टेंभुर्णी (ता.जाफ्राबाद) येथे पीक पाहणी. ११.३० वा. टेंभुर्णी येथून भोकरदनकडे प्रयाण. दुपारी १२ वा. भोकरदन एसडीएम कार्यालयात आगमन. भोकरदन जाफराबाद तालुका टंचाई आढावा बैठक. वा. शेलगांव मार्गे बदनापूरकडे प्रयाण. वा. बदनापूर जालना तालुका टंचाई आढावा बैठक. सायं. वा. वरुडी.

मराठवाड्यातील अपूर्ण प्रकल्पांना केंद्राने निधी द्यावा
जिल्ह्यातकमी पावसामुळे शेतकऱ्यांची पीके हातची गेली आहे. वार्षिक पर्जन्यमानाच्या केवळ ५७ टक्केच पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प ५७ लघु प्रकल्पातसुद्धा अल्प प्रमाणात पाणी साठा आहे. लोअर दुधना प्रकल्पासाठी केंद्रीय जलआयोगाकडून ६०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. अनेक प्रकल्पाची कामे अनेक वर्षापासून निधीअभावी रखडलेली आहेत. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाकडून जिल्ह्यास मदत मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी केंद्रीय दुष्काळ निवारण आयुक्त राघवेंद्र सिंह यांच्याकडे व्यक्त केली. याप्रसंगी आमदार नारायण कुचे, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जिल्हा परिषदेचे सीईओ दीपक चौधरी होते.

पालकमंत्री पुन्हा गरजले
एकलाखाहून अधिक रक्कमेच्या शेती कर्जासाठीसुद्धा मॉर्टगेज किंवा सर्च रिपोर्टची गरज नाही. फक्त सेल्फ डिक्लेरेशन (स्व-प्रतिज्ञापत्र) घेऊन बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावे. जे बॅँक व्यवस्थापक शेतकऱ्यांची विविध कागदपत्रांच्या नावाने अडवणूक करत असतील त्यांचा परवाना रद्द होऊ शकतो. याबाबत बँकांच्या मुख्य कार्यालयांना यापूर्वीच नोटीसा दिलेल्या आहेत. दरम्यान, यापूर्वी पालकमंत्री लोणीकरांनी अशाच सूचना दिलेल्या आहेत, मात्र बँकांकडून पुरेसा प्रतिसाद मिळेना. परिणामी जुन, जुलै १२ ऑगस्ट उलटूनही फक्त ६० टक्के पीककर्ज वाटप झालेले आहे. शिवाय, नवे-जूने करून हा आकडा फुगवलेला आहे. तर कर्ज पुनर्गठनाचा आकडा बँकांकडून अद्याप प्राप्त नाही.

नापिकी, दुष्काळ, बेरोजगारीमुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. यासाठी शासनाने उपाययोजना राबववाव्यात अशी मागणी आमदार अर्जुन खोतकर यांनी केंद्रीय दुष्काळ निवारण पथकाचे प्रमुख राघवेंद्रसिंग यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. जिल्ह्यात लाख हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र असून ९० टक्के पेरणी खरीप हंगामात झाली. पाऊस पडल्यामुळे खरीप हंगामच पुर्णपणे वाया गेला आहे. पावसाळा उलटून दोन महिने झाल्यामुळे दुबार पेरणीही कठीण आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्ज मुक्ती करावी, हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान देण्यात यावे, शेतकरी मजुरांना रोजगार द्यावा, पाण्याची सोय करावी, जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्यात याव्यात असेही खोतकर म्हणाले.