आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथकाला खा. खैरेंनी भररस्त्यात थांबवले, पॉझिटिव्ह' राहण्याचा दिला सल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे, आतापर्यंत साडेनऊशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तेव्हा तातडीची मदत म्हणून मराठवाड्याला तीन हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय पथकासमोर केली. आता या पथकाने पॉझिटिव्ह व्हावे, अन्यथा आत्महत्या वाढतील अन् त्याला केंद्र सरकारच जबाबदार असेल, असा इशाराही दिला.

एका खासगी कार्यक्रमासाठी खैरे भूमकडे (जि. उस्मानाबाद) जात होते. तेव्हा केंद्रीय पथक पाचोड येथे पाहणी करत असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर बीडकडे निघालेल्या पथकाला पाचोड गावात मुख्य रस्त्यावरच थांबवून खैरे यांनी १५ मिनिटे पथकाशी चर्चा केली. खैरे म्हणाले, यापूर्वीही केंद्राची पथके आली अन् गेली; पण मदतीचे काहीही झाले नाही. या वेळी तसे होऊ देऊ नका, कारण परिस्थिती विदारक आहे.
नोव्हेंबर महिन्यापर्यंतच मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा साडेनऊशेपर्यंत पोहोचला आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली नाही तर भविष्यात हा आकडा वाढू शकतो. तसे झाल्यास याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असेल. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देताना पॉझिटिव्ह असावे, असा सल्लाही त्यांनी पथकाला दिला.

खैरे भुमरेंच्या कार्यालयात!
खासदारखैरे पैठणचे आमदार संदिपान भुमरे यांच्यातील बेबनाव सर्वपरिचित आहे. परंतु केंद्रीय पथकाची भेट घेतल्यानंतर खैरे भुमरे यांच्या पाचोड येथील कार्यालयात थांबले. ‘बीडकडे जाताना कॉफी पिण्यासाठी मी नेहमीच येथे थांबतो. हा माझा स्टॉप आहे,’ असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे भुमरे पथकासोबत असताना खैरे तेथे गेले नाहीत. भुमरे यांच्याकडून पथक पुढे निघाल्यानंतर खैरेंनी पथकाला रोखले.