आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Droughts At Marathwada Tommorow Drought March At Aurangabad

भारतीय कम्युनिस्ट पार्टीतर्फे गुरुवारी दुष्काळी दिंडी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दुष्काळाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी सरकार आणि प्रशासन गंभीर नाही. पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, रोजगार हमीची कामे, थकीत मजुरी देण्यासाठी उदासीन धोरण अवलंबले जात आहे. या निषेर्धात भारतीय कम्युनिस्ट पार्टीतर्फे 24 जानेवारीला विभागीय आयुक्त कार्यालयावर दुष्काळी संघर्ष दिंडी काढण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. निषेध नोंदवण्यासाठी भोसी (जिंतूर) ते औरंगाबाद असा संघर्ष दिंडीचा मार्ग असणार आहे. दिंडी 18 रोजी भोसी येथून निघाली असून 24 जानेवारीला ती औरंगाबादमध्ये पोहोचेल.दिंडीत आमदार जयंत पाटील, भालचंद्र कांगो, अँड.मनोहर टाकसाळ, प्रा. राम बाहेती सहभागी होणार आहेत.