आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाजत-गाजत केले स्त्री जन्माचे स्वागत, रुग्णालयापासून घरापर्यंत काढली चिमुरडीची मिरवणूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या मातृत्वाचा आणि कर्तृत्वाचा गौरव सुरू असतानाच तिने जगात पाऊल ठेवले. याचा पित्याला एवढा आनंद झाला की, त्याने रुग्णालयातून बाळ आणि बाळंतिणीला सुट्टी मिळताच बँडबाजाच्या गजरात मिरवणूक काढून त्या चिमुरडीला घरी नेले. बजाजनगरातील डॉक्टर दांपत्य डॉ. प्रसाद हराळ पाटील डॉ. पूजा हराळ पाटील यांनी मुलीच्या जन्माचे असे आगळेवेगळे स्वागत केले. 
 
देशभरात स्त्री भ्रूणहत्यांचे प्रमाण त्यामध्ये डॉक्टरांचा सहभाग असे प्रकरण गाजत असतानाच हराळ पाटील दांपत्याने मुलीच्या जन्माचे स्वागत केल्याने हा समाजासमोर आदर्श उदाहरण ठेवले आहे. डॉ. हराळ यांनी रुग्णालय परिसरात पेढे वाटून लेकीच्या जन्माचा आनंद सोहळा साजरा केला. बजाजनगर येथील अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये हाडांचे तज्ज्ञ म्हणून काम पाहणारे डॉ. प्रसाद पाटील यांच्या डॉक्टर पत्नी पूजा यांना गर्भधारणा झाल्यानंतर बाळाची वाढ व्यवस्थित होत नसल्यामुळे त्यांना कायदेशीर गर्भपात करण्याचा सल्ला दिला गेला. 
 
मात्र,डॉ. प्रेरणा देवधर यांच्याकडे उपचार सुरू असताना बाळात सकारात्मक बदल दिसून येत असल्यामुळे त्यांनी बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. बाळाला जन्म देण्याचा प्रसंग तसा धोकादायक होता. दरम्यान गरोदर असताना डॉ. पूजा यांनी पतीसह फिरायला जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर डॉ. प्रसार यांनी कोणताही विचार करता आठ दिवसांमध्ये तब्बल अठराशे किमीचे पर्यटन करून पत्नीची फिरण्याची इच्छाही पूर्ण केली. अखेर मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या दिवशी डॉ. पूजा हराळ पाटील यांनी एका गोंडस कन्येला जन्म दिला. 
 
पुढीलसहा महिने उपचार मोफत : मुलींचाजन्मस्तर उंचावा, मुलींच्या जन्माचे समाजामध्ये स्वागत होणे अपेक्षित असल्याची भावना व्यक्त करीत डॉ. प्रसाद यांनी पुढील सहा महिने मुलींसाठी हाडांचे उपचार पूर्णत: मोफत करण्याची घोषणा केली. शिवाय आपल्या मुलीच्या प्रत्येक वाढदिवसाला विशेष शिबिर घेऊन खास करून मुलींवर उपचार करणार,असेही डॉ. प्रसाद यांनी सांगितले. आम्हाला मुलगीच हवी होती आणि मुलगीच झाल्याने हा आनंद शब्दांत व्यक्त होऊच शकत नाही, असे डॉ. पूजा यांनी सांगितले. 
 
महिलादिनीच घेतला स्त्री जन्माच्या स्वागताचा निर्णय 
जन्मानंतर मुलगी आईला सुखरूप पाहून डॉ. प्रसाद यांचे डोळे पाणावले. समाजातील प्रत्येकाने स्त्री जन्माचे स्वागत करावे, या उद्देशाने त्यांनी स्त्रीभ्रूणहत्या विरोधी तसेच स्त्री जन्माचे स्वागत करणारे पोस्टर्स तयार करत वाजत-गाजत मुलीला घरी घेऊन जाण्याचा निश्चय केला. शनिवारी सकाळी बजाज हॉस्पिटल येथून वाजत-गाजत नातेवाइकांसह मुलीला घरी नेले. या वेळी डॉक्टर प्रेरणा देवधर, कचरू हराळ पाटील, शोभा हराळ पाटील, नितीन पाटील,भूषण कुलकर्णी, संदीप पाटील, छाया पाटील, प्रियंका हराळ पाटील आदी दोन्ही कुटुंबांतील नातेवाइकांची उपस्थिती होती. 
बातम्या आणखी आहेत...