आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंमली पदार्थांची तस्करी, नायजेरियन भामट्यास अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अमलीपदार्थांची तस्करी करणाऱ्या एका नायजेरियन भामट्यास पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून २२ हजार ५०० रुपयांचे मॅफेड्रॉन नावाचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. च्युययू अलॉय इम्युन्यूल (३६, रा.लागोस, नायजेरिया, ह.मु.चकाला, मुंबई) असे त्याचे नाव आहे. सिडको येथील गोपाल ऊर्फ गौरव हरी शर्मा याच्या घरात अमली पदार्थ जप्त केले होते. त्याने अमली पदार्थ मुंबई येथील च्युययू अलॉय ईम्युन्यूल या नायजेरियन तरूणाकडून घेतल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक महेश आंधळे, प्रकाश मोहिते, विक्रम देशमुख, घीरज जाधव, प्रेम म्हसके,संजय घुगे, सुनील शिराळे यांनी मुंबईहून भामटयाला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयाने ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.