आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मद्यधुंद महिला डॉक्टरने केला ठाण्यासमोर धिंगाणा, दुसऱ्या डॉक्टरने केली दगडफेक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मद्यधुंद महिला डॉक्टरने पोलिस ठाण्यासमोर धिंगाणा घातला, तर दुसऱ्या एका डॉक्टरने आरेफ कॉलनी येथील धार्मिक स्थळावर दगडफेक केली. या दोन्ही प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्योतीनगर येथील डॉ. सोनाली सुभाष कुलकर्णी (२८) महिलेचे आई-वडील सिडकोत वास्तव्यास आहेत. सोनाली माहेरी आली असता तिचा घरात काहीतरी कारणावरून वाद झाला. त्यामुळे २३ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजता तिने मद्यप्राशन करून सिडको पोलिस ठाण्याच्या समोर धिंगाणा घालण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी बराच वेळ समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण फायदा झाला नाही. घाटीच्या डॉक्टरांनी तिने मद्य प्राशन केल्याचा अहवाल दिला. यावरून सिडको पोलिस ठाण्यामध्ये तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याआधी देखील तिने मद्यप्राशन करून धिंगाणा घातल्याचे सिडको पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी सांगितले.

पुढील स्‍लाइडवर वाचा तर दुसऱ्या डॉक्टरची दगडफेक...