आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drunk Father Suicide Attempt With Two Child In Aurangabad

मद्यपी पित्याचा दोन बाळांसह रेल्वेखाली आत्महत्येचा प्रयत्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आपल्या दोन्ही मुलांसह मद्यधुंद अवस्थेत रेल्वे पटरीवर झोपलेल्या 28 वर्षीय तरुणास एका सतर्क रिक्षाचालकामुळे वाचवण्यात यश आले. ही घटना गुरुवारी दुपारी मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनजवळ घडली.

यासंदर्भात पोलिस सूत्रांनी सांगितले की, गुरुवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनच्या पुढे एक 28 वर्षांचा तरुण मद्यधुंद अवस्थेत दोन लहान मुलांना घेऊन रेल्वे पटरीवर झोपला. तो रेल्वेची वाट पाहत होता. त्याचा दोन्ही मुलांसह रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा बेत होता. तेवढय़ात एका रिक्षाचालकाची नजर त्याच्यावर गेली.

त्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन याची माहिती तत्काळ मुकुंदवाडी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्या तरुणाला ताब्यात घेतले. त्या मुलांनाही बरोबर घेऊन रिक्षातून पोलिस ठाण्यात आणले.

अडीच वर्षांचा मुलगा त्याचे नाव आदित्य सांगतो. दुसरा वर्षाचा असावा. तो झोपेत होता. हा मद्यधुंद तरुण जयभवानीनगर येथील गल्ली नंबर चारमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मद्यधुंद अवस्थेत तो रेल्वे पटरीवर का झोपला होता, याची माहिती त्याची नशा उतरल्यानंतर मिळेल, असे पोलिसांनी सांगितले. रिक्षाचालकामुळे त्या चिमुकल्यांचा जीव मात्र वाचला.