आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रायफ्रूट्सच्या बॉक्सची शहरामध्ये 20 कोटींची बाजारपेठ, 10 टक्के दरवाढ होऊनही मागणी कायम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दिवाळीच्या सणानिमित्त कॉर्पाेरेट जगतात खास मागणी असणाऱ्या ड्रायफ्रूट्स बॉक्सची बाजारपेठ शहरात विस्तारली असून यात २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. ड्रायफ्रूटच्या बॉक्समधील वेगवेगळ्या पदार्थांना वेगवेगळे जीएसटी लागल्यामुळे सुरुवातीला व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम होता.
 
मात्र, लगेचच तो दूर झाल्यामुळे ड्रायफ्रूटच्या बाजारात गर्दी वाढली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी २०० रुपयांपासून २००० रुपयांपर्यंतचे पर्याय उपलब्ध असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा दरात १० टक्क्यांची वाढ झाली आहे. ड्रायफ्रूटच्या बॉक्समध्ये काजू, किसमिस, अक्रोड, बदाम, पिस्ता, जर्दाळू, अंजिर, खारा, पिस्ता आदींचा समावेश असताे. 

यंदा या प्रत्येक घटकाला वेगवेगळे जीएसटी लागू असल्याने ते बॉक्समध्ये कसे भरायचे आणि त्यांना कसा दर लावायचा याबाबत व्यावसायिकांमध्ये थोडा संभ्रम होता. जीएसटी कायद्याप्रमाणे वेगवेगळे पदार्थ एकत्र विकण्याच्या प्रकाराला मिक्स सप्लाय असे म्हणतात. अशा प्रकारात सर्व पदार्थांमध्ये सर्वाधिक किंमत असलेल्या पदार्थांना लागणारा कर संपूर्ण पदार्थांच्या एकत्रित किमतीवर लागतो, अशी माहिती सीए राेहन आचलिया यांनी दिली. ही माहिती मिळाल्याने व्यावसायिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 
 
जीएसटीमुळे व्यवसायावर परिणाम झालेला नाही 
ड्रायफ्रूटच्याबॉक्सचे २०० रुपयांपासून २००० रुपयांपर्यंतचे पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. या बॉक्सना वैयक्तिक ग्राहकांपेक्षा कॉर्पाेरेट स्तरावर अधिक मागणी असते. यासाठी दोन महिने आधीच बुकिंग झालेले असते. आता ऑर्डरची डिलिव्हरी सुरू आहे. ड्रायफ्रूटच्या बॉक्सना चांगली मागणी असल्याचे निराला बाजारातील जे.पी.सुराणा अॅण्ड कंपनीचे संचालक महेंद्र सुराणा यांनी दिली. भावे अॅण्ड कंपनीचे संचालक विश्वजित भावे म्हणाले, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ड्रायफ्रूटचे दर १० टक्क्यांनी वाढले आहेत. तरी यास तेवढीच मागणी आहे. ड्रायफ्रूट बाॅक्सची शहरातील बाजारपेठ २० कोटी रुपयांच्या घरात असण्याचा अंदाज रोहन ड्रायफ्रूट्सचे संचालक संकेत सांकलिया यांनी व्यक्त केला. जीएसटीमुळे या व्यवसायावर परिणाम झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 
 
बातम्या आणखी आहेत...