आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dted Admission For Any Student New Scheme Aurangabad

मागेल त्याला डीटीएड प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - डीटीएड प्रवेश प्रक्रियेस सुरुवात होऊन तीन महिने उलटले तरी प्रवेशासाठी विद्यार्थीच मिळेनात. त्यामुळे डीटीएड महाविद्यालयांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शिक्षण विभागाने आता डीटीएड अर्थात शिक्षक पदविका अभ्यासक्रमाला मागेल त्याला प्रवेश देण्याचा नवा फंडा अवलंबला आहे.

एकेकाळी शिक्षकांना चांगला पगार मिळत असल्यामुळे डीटीएड करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल होता. जावई शिक्षकच हवा, असा आग्रह केला जायचा. परंतु काळानुरूप डीटीएड महाविद्यालयांची संख्या वाढली. पण त्या तुलनेत नोकर्‍या घटल्या. गेल्या चार वर्षांपासून डीटीएड पदविका मिळवणार्‍या विद्यार्थ्यांसाठी सीईटी झाली नाही. यामुळे बेरोजगार विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. त्यामुळे शहाण्याने डीटीएड करू नये, असा संदेश या क्षेत्रात पोहोचला. मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वळत आहेत. या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा यासाठी शिक्षण विभागाने ही नवी शक्कल लढवून मागेल त्याला डीटीएड प्रवेश देणे सुरू केले आहे. डीटीएडच्या हजारांवर जागा रिक्त आहेत. त्यामुळे महाविद्यालये चालवायची तरी कशी, असा प्रo्न निर्माण झाला आहे. तीन महिन्यांपासून सुरू असलेली ही प्रवेश प्रक्रिया 7 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. 15 सप्टेंबर रोजी स्पॉट अँडमिशनही देण्यात येणार आहेत. या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही शिक्षण विभागाने केले आहे.

अशा आहेत जागा
औरंगाबाद : 1 हजार 597, अर्ज विक्री 124
जालना : 580, अर्ज विक्री 495
बीड : 1 हजार 568, अर्ज विक्री 1 हजार 46
परभणी : 1 हजार 100, अर्ज विक्री 597
हिंगोली : 610, अर्ज विक्री 511

का फिरवली विद्यार्थ्यांनी पाठ
गेल्या चार वर्षांपासून नोकरीसाठीची सीईटी परीक्षा झाली नाही
महाविद्यालयांची संख्या वाढली, त्या तुलनेत विद्यार्थी संख्या घटली
शिक्षणासाठी आणि त्यानंतर नोकरीसाठी लाखो रुपये भरावे लागत आहेत

मागेल त्याला प्रवेश
डीटीएड प्रवेशाच्या जागा अद्यापही रिक्त आहेत. त्यामुळे सात तारखेपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे. 15 तारखेला स्पॉट अँडमिशनही ठेवण्यात आले आहे. मॅनेजमेंट कोट्यातूनही मागेल त्याला प्रवेश देण्यात येईल. सुखदेव डेरे, शिक्षण उपसंचालक