आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑटो क्लस्टरमुळे वर्षभरात साठ लाख रुपयांची बचत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गेल्या वर्षभरात मराठवाडा ऑटो क्लस्टरचा २२३ कंपन्यांनी लाभ घेतला आहे. यातून कंपन्यांचे ६० लाख रुपये आणि किमान पाच दिवसांचा वेळ वाचला आहे. येत्या जुलैला ऑटो क्लस्टरच्या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या इमारतीचे उद््घाटन केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. बुधवारी सेंटर ऑफ एक्सलन्समधल्या मशिनरीची पाहणी उद्योजकांनी केली. ऑटो क्लस्टरचे अध्यक्ष राम भोगले, सीईओ भरत गंगाखेडकर यांनी सादरीकरण केले. या वेळी सीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीराम, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र गावडे, मुनीश शर्मा, मिलिंद कंक, उमेश दाशरथी, मुकुंद कुलकर्णी, मानसिंग पवार, प्रशांत देशपांडे, बालाजी शिंदे, सुनील किर्दक, आशिष गर्दे यांची उपस्थिती होती.
पाण्याची बचत : या प्रकल्पात रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग करण्यात आला आहे. त्याद्वारे इमारतीवर पडणारे पाणी वॉटर टँकमध्ये साठवण्यात येते. त्यासाठी दहा हजार लिटरचे प्रत्येकी पाच वॉटर टँक तयार करण्यात आले.

साध्य काय : मागील वर्षभरात परिसरातील २२३ उद्योजकांच्या विविध कामांत ६० लाख रुपयांची बचत. पाच दिवसांइतक्या वेळेची बचत.

पुढे काय : सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून अधिक दर्जेदार कमी किमतीत उत्पादन वाढ साधण्याचा प्रयत्न. स्पर्धेत टिकण्यासाठी उद्योजकांना मदत.

ऑटो क्लस्टरचा उद्देश

जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी औरंगाबादेतील उद्योजकांना एकाच छताखाली पायाभूत सुविधा देणे. परिसरातील वाहन वाहनाचे सुटे भाग निर्मिती अभियांत्रिकी उद्योगांना आधार देणे. किफायतशीर किमतीत दर्जा उत्पादन वाढवत विकास साधणे.
वीस प्रकारच्या मशिनरी
या प्रकल्पात साधारण ५० कोटी रुपये किमतीच्या वीस वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी आहेत. उद्योजकांना भाडेतत्त्वावर त्या वापरता येतात. त्यामुळे उद्योजकांना विशिष्ट जॉबवर्कसाठी इतर शहरांत जाण्याची गरज उरलेली नाही. लेझर कटिंगच्या मशिनरीद्वारे विविध पार्ट अचूक मोजमाप बनवता येतात. वाळूजच्या १२० उद्योजकांनी याचा लाभ घेतला. हाय स्पीड ऑटो ब्लँकिंग मशिनरीच्या माध्यमातून एका मिनिटात पन्नास पार्ट तयार करता येतात.
सुखद अनुभव : भोगले यांनी सांिगतले की, मला एका जॉबवर्कसाठी पुण्यात रॉ मटेरियल पाठवावे लागायचे. त्यासाठी पाच लाख रुपये खर्च यायचा. या ऑटो क्लस्टरमध्ये हे जॉबवर्क साडेतीन लाख रुपयांत झाले.
राज्यात नाशिक आणि पिंपरी-चिंचवड येथे ऑटो क्लस्टर आहेत. मात्र, औरंगाबादेतील ऑटो क्लस्टरच्या उभारणीसाठी येथील उद्योजकांनी पुढाकार घेतला. एवढेच नव्हे तर उद्योजकांनी यासाठी १२ कोटी २४ लाख रुपये दिले आहेत. विशेष म्हणजे २०१० मध्ये यासाठी निधी मंजूर झाला होता. नंंतर याच रकमेत हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. एकीकडे सरकारी प्रकल्पांच्या किमती वाढत असताना ऑटो क्लस्टर मात्र ठरलेल्या निधीत वेळेत पूर्ण झाल्याकडे भोगले यांनी लक्ष वेधले. नाशिकच्या उद्योजकांनी पैसे गुंतवलेले नाहीत.
मराठवाडा ऑटो क्लस्टर असे
५८.२०
कोटी केंद्र सरकारचे
८.९
लाख राज्य सरकारचे
१२.२४
कोटी उद्योजकांचे
०४
एकर जागेत उभारणी
८३
कोटी एकूण खर्च
बातम्या आणखी आहेत...