आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमभंग झालेल्या महिला डॉक्टरने घेतला गळफास, 2 जून रोजी घडली घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्रेमभंग झालेल्या एका महिला डॉक्टरने २ जून रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक काशीनाथ महांडूळ यांनी सरकारी पक्षाकडून पाच जून रोजी फिर्याद दिली असून डॉ. दीपक टाके याच्या विरोधात सातारा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा परिसरातील ४० वर्षीय डॉ. सारिका (नाव बदलेले आहे) या मूळच्या कर्नाटक येथील होत्या. गेल्या काही वर्षांपासून त्या शहरातील एका खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करत होत्या. चार वर्षांपूर्वी त्यांची ओळख डॉ. टाके याच्याशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. सारिका यांच्या पतीचे निधन झाले असून त्यांना एक मुलगा आहे. त्या जेव्हा जेव्हा डॉ. टाके याच्याशी लग्नाचा विषय काढायच्या तेव्हा तो टाळाटाळ करायचा, त्यामुळे आत्महत्या केल्याचे कारण मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पुढील स्लाईडवर वाचा... स्टंटबाजी करताना पिंपरी-चिंचवडच्या तरुणाने गमवले दोन्ही पाय.... बघा भयानक फोटो....
बातम्या आणखी आहेत...