आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोसाळकर-कदम यांच्या वादात रखडले शिवसेनेतील फेरबदल!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, उपशहरप्रमुखांसह शिवसेनेतील विविध पदांचे फेरबदल एक महिन्यापूर्वीच होणे अपेक्षित होते. परंतु पालकमंत्री रामदास कदम संपर्कनेते विनोद घोसाळकर यांच्यातील वादामुळे ते रखडल्याचे विश्वसनीय सूत्रांनी म्हटले आहे.
महानगरपालिका निवडणूक संपताच नवीन पदाधिकारी दिले जातील, काहींचा खांदेपालट होईल, असे पक्षाने स्पष्ट केले होते. पालिकेतील सत्ता युतीने राखली महापौरपदही सेनेकडेच आले. त्यानंतर लगेचच नवे पदाधिकारी जाहीर होतील, अशी अपेक्षा होती. त्यानुसार काहींनी ग्रामीणचे जिल्हाप्रमुख, पश्चिमचे शहरप्रमुख या पदांसाठी, तर अन्य कार्यकर्त्यांनी उपजिल्हाप्रमुख, उपशहरप्रमुख या पदासांठी फील्डिंग लावली होती. शहरप्रमुख त्याखालच्या पदाधिकाऱ्यांची नावे स्थानिक पातळीवरच अंतिम केली जातात नंतर "मातोश्री'वरून त्यावर शिक्कामोर्तब केले जाते.
स्थानिक पातळीवरील फेरबदलासाठी पालकमंत्री कदम, संपर्कनेते घोसाळकर, खा. खैरे, माजी आमदार जैस्वाल, जिल्हाप्रमुख दानवे यांनी एकत्र येऊन निर्णय घेणे अपेक्षित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जी नावे समोर ठेवण्यात येणार होती त्यावरून बैठकीपूर्वीच वाद झाला.
त्यामुळे नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांसमोर परस्पर नाराजी व्यक्त करण्यात येत असल्याने कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. पालकमंत्री मोठे की संपर्कनेते यावरूनच वाद असल्याचे समजते.
समित्या, संघटनेचा विषयच नाही
जिल्हास्तरीय विविध समित्यांवर सदस्य नियुक्त्यांचा निर्णय २२ जूनला घेतला जाईल, असे कदम यांनी सांगितले होते. त्यासाठी त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सुभेदारीवर बोलावले होते. मात्र, त्यांनी समित्यांचा विषय काढता समांतरच्या विषयाला प्राधान्य दिले. ही बैठक संपल्यानंतर तरी ते संघटनात्मक नियुक्त्यांचा विषय काढतील, ही अनेकांची अपेक्षा फोल ठरली.
एकत्र येणे टाळले
वादानंतर घोसाळकर आणि कदम यांनी एकत्र येणे टाळल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी मनोहर जोशी यांना पाचारण करण्यात आले होते. पालकमंत्री या नात्याने कदमांची उपस्थिती अपेक्षित होती, परंतु ते फिरकले नाहीत. घोसाळकर मात्र उपस्थित होते. याच आठवड्यात जिल्हा नियोजन मंडळाची बैठक होती. या बैठकीकडे आमदार संजय शिरसाट काही पदाधिकारी फिरकले नाहीत. कदम यांनी संघटनेची बैठक घेणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी फक्त समांतरच्या करारात बदल करण्यासाठी प्रयत्न केले अन् भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दमबाजी केली. त्यामुळेही सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांत नाराजी आहे.
मतभेद नाहीत
- आमच्यात कसलेही वाद नाहीत. फेरबदल लवकरच जाहीर होतील. जुलैला मी शहरात येत आहे. तेव्हा निर्णय घेतला जाईल. संघटनेत मतभेद असतात, पण आमच्यात तर तेही नाहीत.
विनोद घोसाळकर, संपर्कनेते.
बातम्या आणखी आहेत...