आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Due To Incomplete Manpower Police Gone In Stress

वरिष्ठांची खप्पामर्जी आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांवर ताण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- रजा तसेच साप्ताहिक सुटी मिळत नाही म्हणून पोलिस कर्मचारी आत्महत्या करतात किंवा तसा प्रयत्न करतात, असे समोर येते. शनिवारी औरंगाबाद शहरात असाच प्रयत्न झाला. प्रत्यक्षात पोलिसांना रजेचा अधिकार आहे, परंतु अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांना साप्ताहिक सुटीही मिळत नाही. दुसरीकडे हक्काच्या रजाही घेता येत नाहीत.
नियमाने खूप काही दिले; पण विद्यमान परिस्थितीत त्यातील एकाचाही फायदा पोलिसांना घेता येत नाही, असे चित्र आहे.
उस्मानपुरा ठाण्यातील जमादार अनिल यंगुपटला यांनी शनिवारी सायंकाळी आत्महत्येचा प्रयत्न केला. कारण हक्काच्या साप्ताहिक सुटीच्या दिवशी त्यांना पोलिस निरीक्षकांनी सर्व कामे सोडून कामावर येण्यास बजावले होते. तपास, पीसीआर किंवा एमसीआर असे काम असेल तर पोलिसांना साप्ताहिक सुटी असली तरी त्याकडे दुर्लक्ष करून कामावर जावे लागते. कारण वरिष्ठांनी तशी जबाबदारी दिलेली असते. हक्काच्या रजा घेतानाही वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागते.
प्रत्येक पोलिस ठाण्यात किमान १५० कर्मचारी असावेत, असा दंडक आहे; परंतु औरंगाबाद शहरातील पोलिस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांची संख्या ११० च्या आसपास आहे. त्यामुळे अतिरिक्त ताण असतोच. त्यातच उपायुक्त तसेच सहायक आयुक्त यांच्या कार्यालयासाठी कर्मचारी देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे प्रत्येक पोलिस ठाण्यातून चार ते सहा कर्मचारी या कार्यालयासाठी पाठवले जातात. अाधीच कर्मचारी कमी, त्यातून पुन्हा त्यातील काही अन्यत्र रवाना होतात. त्यामुळे ठाण्यातील कर्मचाऱ्यांची संख्या १०० पेक्षाही कमी असते. अनेकांना वेगवेगळ्या कारणांसाठी रजा लागतेच. त्यामुळे दररोज ९० पेक्षा जास्त कर्मचारी ठाण्यात उपस्थित असत नाहीत. त्याचा परिणाम ठाणेप्रमुखाच्या कामावर होतो. त्यामुळे जे कर्मचारी काम करतात, त्यांना सुट्या दिल्या जात नाहीत. त्यातून मग आत्महत्या करण्याचे किंवा तसा प्रयत्न करण्याचे प्रकार घडतात.
सामाजिक ताण: नजीकच्यानातेवाइकांचे लग्न किंवा अन्य कार्यक्रमालाही त्यांना उपस्थित राहता येत नाही, याचा परिणाम त्यांच्या कौटुंबिक संबंधांवर होतो. एखादा ठाणेप्रमुख चांगला असेल तर तो ऑन ड्यूटी सुटी देतो, पण एखादा खाष्ट असेल तर मग हक्काची रजाही मिळत नाही. यातूनच असे प्रकार घडत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न
- वरिष्ठ रजा देत नाहीत म्हणून एका एएसआयने घाटी रुग्णालयात गोळी घालून आत्महत्या केली.
- ग्रामीण एसपीच्या जाचाला कंटाळून पीआय केटी पवार यांनीही आत्महत्येचा प्रयत्न केला.
- उस्मानपुरा पोलिस ठाण्यात पी. आय. च्या जाचाला कंटाळून एएसआय जी. बी. पवार डी. पी. बोरके यांनी तक्रार केली

रजेचा तपशील
वैद्यकीय रजा (यापेक्षा जास्त रजा झाल्यास मेडिकल बोर्डाकडे जावे लागते)
२७ किमान
सा. सुटीला काम केल्यास मिळतात
६८
विशेष रजा
6
अर्जित रजा
३०
सी. एल.
१२
एकूण हक्काच्या रजा
४५