आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Due To Khaire Aurangabad renigunta Express One Day Late

खैरेंमुळे एक्स्प्रेस एक दिवस लेट, बागडेंनी धरली बाहेरची वाट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - रेल्वे मंत्रालयाकडून महत्प्रयासाने मंजूर करून घेतलेल्या आैरंगाबाद-रेणीगुंटा एक्स्प्रेसला दक्षिण मध्य रेल्वेने एक दविस उशिरा प्लॅटफॉर्मवर आणले. संसदेच्या अधविेशनात व्यग्र असल्यामुळे शुक्रवारऐवजी शनविारी उद्घाटन कार्यक्रम ठेवा, असे खासदार चंद्रकांत खैरे यांनीच रेल्वेला सुचवले होते. यापुढे नियमितपणे शुक्रवारी धावणाऱ्या तेरा डब्यांच्या या नव्या गाडीला खैरे यांनी शनविारी (१३ डिसेंबर) नियोजित वेळेपेक्षा पाऊण तास उशिरा ‘झेंडी’ दाखवून सुमारे पाचशे प्रवाशांना तिष्ठत ठेवत आैपचारिकता पूर्ण केली.
आैरंगाबादहून तिरुपतीला जाणाऱ्या भक्तांची वाढती संख्या लक्षात घेता नवीन रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी खासदार चंद्रकांत खैरे यांनी लावून धरली. प्रारंभी आैरंगाबाद-तिरुपती विशेष रेल्वेगाडी प्रत्येक शुक्रवारी काही दविसांसाठी सुरू केली व नंतर वेळोवेळी तिला मुदतवाढ दिली. आघाडी सरकारच्या शेवटच्या रेल्वे बजेटमध्ये आैरंगाबाद-रेणीगुंटा एक्स्प्रेसची घोषणा फेब्रुवारी २०१४ मध्ये झाल्यानंतर ही गाडी दर शुक्रवारी चालवण्याचे निश्चित झाले.
उद‌्घाटनप्रसंगी नांदेडचे विभागीय सहायक रेल्वे व्यवस्थापक प्रकाश निनावे, विभागीय अभियंता समन्वयक राजकुमार वानखेडे, महापौर कला आेझा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक नेहा रत्नाकर, विभागीय मेकॅनिकल इंजिनिअर जी. अप्पाराव, के. एन. बापूराव, मराठवाडा रेल्वे प्रवासी सेनेचे संतोषकुमार सोमाणी, मराठवाडा रेल्वे विकास समितीचे आेमप्रकाश वर्मा, रेल्वे उपभोक्ता समिती सदस्य भावेश पटेल, स्वातंत्र्यसैनिक ताराबाई लड्डा, विक्रमादित्य, शविाजी बनकर, व्यवस्थापक अशोक निकम, एल. के. जाखडे, डी. चंद्रमोहन आदींची उपस्थिती होती.
कोणावर राग काढायचा?
खासदार खैरे यांच्या वेळेअभावी एक दविस उशिरा उद‌्घाटनाचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले. असे असतानाही दुपारी ४ वाजता हिरवी झेंडी दाखवण्याचे नियोजन असताना खैरे पाऊण तास उशिरा आल्याने पाचशे प्रवाशांना तिष्ठत बसावे लागले. एरवी रेल्वेला उशीर झाल्यास रेल्वे कर्मचाऱ्यांवर राग व्यक्त केला जातो. आता खासदार उशिरा आल्याने कुणावर राग काढायचा, अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती.
दोन इंजिनसह नटली गाडी
गाडीत पाचशेवर प्रवासी आैरंगाबादहून बसले होते. दोन इंजिन जोडलेली पूर्ण गाडी केळी व नारळाच्या पानांनी सजवण्यात आली होती. गाडीला परळीपर्यंत वरिष्ठ लोको निरीक्षक विनोद साठे, लोकोपायलट हरिसिंग, नवीनकुमार, गार्ड यशवंत लोखंडे घेऊन गेले.
बागडेंचा काढता पाय
झेंडी दाखवण्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना देण्यात आले होते. बागडे नियोजित वेळेप्रमाणे ४ वाजता रेल्वेस्थानकावर पोहोचले. त्यांनी अर्धा तास खासदार खैरेंची वाट पाहिली. खैरेंना अजून दहा मिनटिे लागणार असल्याचे समजल्यावर पुढच्या कार्यक्रमासाठी जाणेच बागडेंनी पसंत केले.
उद‌्घाटनाचा फार्स
आैरंगाबाद-रेणीगुंटा गाडी शुक्रवारी दुपारी ४ वाजता निघून शनविारी सायंकाळी ७ वाजता रेणीगुंटाला पोहोचेल. शनिवारी रात्री १० ला परत निघेल. या गाडीचे उद‌्घाटन शुक्रवारी ठेवले असते तर आरक्षणही सुरू झाले असते. केवळ खासदार खैरे यांना वेळ नसल्यामुळे ती शनविारी सोडण्यात आली.
पुढील स्‍लाइडवर वाचा, राज्यमंत्र्यांनी मार्ग पळवला