आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीशी भांडण झाल्या्याने तरुणाची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुकुंदवाडी परिसरातील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. करण संजय सावंत (२२, राजनगर) या तरुणाचे नाव आहे. करण मजुरी करत असे. शनिवारी पत्नीशी त्याचे भांडण झाले होेते. मी जीव देईन, असेही तिने बोलून दाखवले होते. पत्नी जिवाचे काही बरेवाईट करेल या भीतीने त्याने रविवारी रात्री राजनगर येथील राहत्या घरी पत्र्याच्या अँगलला दोरी बांधून गळफास घेतला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सकाळी आठच्या सुमारास वडील घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला,अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस हवालदार डी. बी. काटकर करत आहेत.

दोनघरे फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
श्रेयनगर आणि भारतनगरातील बंद घरातून चोरट्यांनी ३९ हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रेयनगर येथील अपूर्वा अपार्टमेंटमध्ये राहणारे तुकाराम रखमाजी देवकर (६१) यांच्या घरातून सप्टेंबर रोजी दुपारी चोरट्यांनी चांदीच्या दोन समई रोख सहा हजार असा सुमारे १६ हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. दुसऱ्या घटनेत गारखेडा परिसरातील भारतनगरात आकाश भारत तत्‍तपुरे (२१) यांच्या घरातून ते सप्टेंबरदरम्यान चोरट्यांनी एलईडी टी.व्ही, सीसीटीव्ही कॅमेरा, डीव्हीआर फॅन असा सुमारे २३ हजारांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन दुचाकी लांबवल्या
शहराच्याविविध भागांतून चोरट्यांनी दोन दुचाकी लांबवल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिंबाजी नामदेव कापसे (४०, आंंबेडकरनगर) शनिवारी सकाळी दुचाकीवरून (एमएच २० सीएम ७२३२) जाधवमंडी येथे गेले होते. भाजी खरेदी करून परतल्यावर दुचाकी जागेवर नसल्याचे आढळताच त्यांनी सिडको पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक डोंगरे करीत आहेत. दुसऱ्या घटनेत कृष्णा भाऊराव पाते (२७, मुकुंदनगर ) यांची दुचाकी (एमएच २० बीएच ९४३१) चोरट्यांनी शनिवारी रात्री आठ वाजता एन-४ येथील पारिजातनगरातील उद्यानासमोरून लांबवली. पाते यांच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
२५ हजारांचे ब्रेसलेट हिसकावले
तरुणाला बेदम मारहाण करून चौघांनी त्याचे १२ ग्रॅमचे सोन्याचे ब्रेसलेट हिसकावून घेत पळ काढला. ही घटना सप्टेंबर रोजी रात्री ८.३० च्या सुमारास जिल्हा परिषद मैदानाजवळ घडली. याप्रकरणी दीपक आनंद अंभोरे (२७, रा. मथुरानगर, एन-६ सिडको) यांच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या मैदानाजवळ रवी त्रिभुवन (३२, रा. क्रांतीनगर) तीन साथीदारांनी शिवीगाळ, बेदम मारहाण केली. त्रिभुवन याने २५ हजारांचे ब्रेसलेट हिसकावून पळ काढला, असे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गंभीरराव करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...