आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवगाव रंगारी - कन्नड तालुक्यातील जवळी बु. येथील दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीने शिक्षकाकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली. कल्याणी विलास हार्दे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून रूपेश अशोक साळवे असे त्रास देणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. रूपेश साळवे हा जवळी येथील विद्यालयात शिक्षक असून तो १३ एप्रिल २०१५ ते ११ एप्रिल २०१६ या कालावधीत कल्याणीला राहत्या घरी, शाळेत व रस्त्यात प्रत्यक्ष भेटून व मोबाइलवर एसएमएस करून त्रास देत असे. या त्रासाला कंटाळून कल्याणीने सोमवार, ११ रोजी राहत्या घरी विष प्राशन केले. याप्रकरणी देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात रूपेश अशोक साळवेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.