आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Due To The Nala Kesavanagari And Around Colonies Have Risk

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नालेसफाईचे काम नकली, पाणी तुंबणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शहानूरमियाँ दर्ग्याच्या परिसरातील नाल्याची दोन दिवस सफाई करून गाळ काठावरच टाकण्यात आला आहे. छाया : रवी खंडाळकर )
औरंगाबाद- युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापुरते थाटामाटात सुरू करण्यात आलेले नालेसफाईचे काम अगदीच नकली असल्याचे समोर आले आहे. शहानूरमियाँ दर्ग्याच्या परिसरातील नाल्याची दोन दिवस सफाई करून गाळ काठावरच टाकण्यात आला आहे. एकाच पावसात हा गाळ पुन्हा नाल्यात जाऊन नाला तुंबण्याची भीती आहे. नाला तुंबला तर लगतच्या केशवनगरीला धोका निर्माण होऊ शकतो.
मे महिन्यात मनपाने धडाक्यात शहरात नालेसफाईचे काम हाती घेतले. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे येणार म्हणून ही मोहीम दोन दिवस ठिकठिकाणी राबवण्यात आली. पण नंतर कोणतेही काम पूर्ण करण्यात आले नाही. दर्गा परिसरातील नागरिकांनी इझी डे माॅलच्या मागील नाल्याबाबत तक्रारी केल्या आहेत. या नाल्याची फक्त दोन दिवस सफाई करण्यात आली.
सफाईनंतरचा गाळ काठावरच टाकण्यात आला. तो हलवला गेला नाही. हे ढिगारे एवढे धोकादायक आहेत की, एक पाऊस पडला तरी हा सगळा गाळ पुन्हा नाल्यातच पडणार आहे.
पावसाआधी गाळाचे ढिगारे हटवा
केशवनगरी आसपासच्या वसाहतींना यामुळे धोका निर्माण होणार आहे. नाल्यात पाणी तुंबले तर इझी डेशेजारचा छोटा पूल पाण्याखाली जातो. परिणामी वसाहतीत जाता येत नाही. पलीकडून गादिया विहार रोडवरून जातानाही पाणी तुंबलेले असते. अशा स्थितीत या भागाचे बेटच बनते.
गेल्या वर्षीच्याच पावसात असा प्रकार झाला होता त्या भागाच्या तत्कालीन नगरसेविका साधना सुरडकर यांनाही त्या भागात जाता आले नव्हते. त्यांनी त्या वेळी सभागृहात हा प्रश्न उपस्थितही केला होता. आता येणाऱ्या पावसाळ्यातही अशीच स्थिती निर्माण होण्याची भीती असून मनपाने पावसाआधीच गाळाचे ढिगारे हटवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.