आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: आजारी सारंग होमिओपॅथीच्या उपचारांनी झाला ठणठणीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद: एक आठवड्यापूर्वी विषबाधा झाल्याने जायकवाडी धरणावरील सारंग पक्षाला वन्यजीव अधिकाऱ्यांनी औरंगाबाद येथील पक्षिमित्र डॉ. किशोर पाठक यांच्याकडे उपचारासाठी आणले होते. आठ दिवसांच्या उपचारानंतर सारंग आता ठणठणीत झाला आहे. दोन्ही पंख पसरून तो फडफड करत तोरा दाखवत पळत आहे. शनिवारी (१७ जून) त्याला जायकवाडी धरणाजवळ सोडण्यात येणार आहे. 
 
आठवडाभरापूर्वी ७ जून रोजी जांभळा सारंग पक्षी जायकवाडी धरणावर आजारी अवस्थेत आढळला होता. त्याची अवस्था पाहून वन्यजीव अधिकाऱ्यांनी तत्काळ जीपने औरंगाबादला आणून पक्षिमित्र डॉ. किशोर पाठक यांना दाखवले. पक्षाच्या विष्ठेतून रक्त येत होते. सारंग पक्षाला विषबाधा झाल्याचे निदान झाल्याने त्याला तेथेच ठेवण्यात आले. डॉ. पाठक यांनी त्याच्यावर होमिओपॅथी औषधोपचार सुरू केला. या औषधींनी त्याची विषबाधा कमी झाली. दुसऱ्याच दिवसापासून पक्षी दोन, तीन मासे खाऊ लागला. मूर्छा आल्यासारखा हा पक्षी पहिल्या दिवशी पडून होता. त्याची हालचाल मंदावली होती. आता मात्र तो ठणठणीत झाला. त्याला शनिवारी सकाळी जायकवाडी धरणावर सोडण्यात येईल. डॉ. पाठक यांनी या पक्षावर मोफत उपचार तर केलेच शिवाय रोज त्याच्या मत्स्यभोजनाचाही खर्च केला. 
बातम्या आणखी आहेत...