आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट नोटा खपवणारा शिक्षक नगरमधून फरार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- झटपट श्रीमंत होण्यासाठी घरातच बनावट नोटा छापण्याचा कारखाना उघडणार्‍या राहुल खरतडेने नगरमधील तोफखाना परिसरातील शिक्षक शेख रमजानला बनावट नोटा खपवण्यासाठी दिल्या होत्या, अशी कबुली त्याने पोलिस तपासात दिली आहे. रमजानला ताब्यात घेण्यासाठी जिन्सी पोलिसांचे पथक नगरकडे रवाना झाले होते. परंतु तो फरार झाल्याने पथक बुधवारी सकाळी शहरात परतले. राहुलचे बिंग फुटल्यानंतर पोलिसांनी हजाराच्या नऊ, तर पाचशेच्या दोन अशा दहा हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. राहुल पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत आहे. त्याने दिलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे मंगळवारी रात्री पोलिसांचे पथक नगरकडे रवाना झाले होते.