आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट कागदपत्रांद्वारे जातीचे प्रमाणपत्र काढले; सात जणांविरोधात गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बनावट कागदपत्रांच्या मदतीने छप्परबंद जातीचे प्रमाणपत्र काढणाऱ्या सात जणांविरुद्ध सिटी चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

एमआयएमचे नगरसेवक जमीर अहेमद कादरी, फईम अहेमद कादरी, आमेर, जमीरचा मेहुणा जुबेर, राजपूत, दाभाडे आणि दलाल शेख रब्बानी अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी तहसील कार्यालयात छप्परबंद जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी जुलै २०१६ रोजी बनावट कागदपत्रे जमा केली होती. त्यांनी अन्य सहा जणांचीदेखील बनावट कागदपत्रे सादर केली. ३१ जानेवारी २०१७ रोजी हा प्रकार समोर आल्यानंतर वाहेद अली झाकेर अली हाश्मी यांच्या तक्रारीवरून सिटी चौक पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...