आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट सोने विकताना टोळी गजाआड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - दोन किलो सोने कमी किमतीत देण्याचे अामिष दाखवून रांजणगाव शेणपुंजी येथील सुनील रमेश गवळी यांना लुटण्याच्या तयारीत असलेले भामटे वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात सापडले. पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांच्या पथकाने शनविारी दुपारी २.१५ च्या सुमारास जयभवानी चौक मुकुंदवाडी येथे मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बनावट सोने हस्तगत करण्यात आले आहे.

आरोपी काळूराम सोळंकी (२८, रा. थूल, ता. जयवंतपुरा,जि. झालोर, राजस्थान), पदमराम वाघरी (४५, रा. सोमता, ता. बनिमाल, जि. झालोर) मुलाराम वाघरी (३०, रा. शेवडी, ता. बनिमाल, जि. झालोर) (सर्व ह. मु. करमाड रेल्वेस्टेशन परिसर झोपडपट्टी ) हे आठ दविसांपूर्वी रांजणगाव शेणपुंजी येथील दुकानदार सुनील गवळी (२९, रा. आसाराम बापूनगर, रांजणगाव) यांच्याकडे आले. किरकोळ किराणा सामान खरेदी करताना त्याला सांगतिले की, आम्हाला खोदकाम करताना सोन्याच्या माळा सापडल्या आहेत, परंतु आम्ही गरीब असल्यामुळे त्या माळा सोनाराला विकू शकत नाहीत. त्या तुम्हीच कमी किमतीत घ्याव्यात, अशी गळ घातली.

शिकारीच बनले शिकार
सुनीललाफोन करून औरंगाबाद शहरातील सिडको बसस्थानकात सकाळी ११ च्या सुमारास बोलावण्यात आले. येताना तू एकटाच ये, असे वारंवार त्याला सांगण्यात आले. मात्र, सुनीलसोबत अन्य एक व्यक्ती असल्याची खात्री पटल्यानंतर भामट्यांनी सुनीलला शहरातील ववििध भागांत तब्बल तीन तास पायी फिरवले. पाळतीवर असलेल्या पोलिसांनाही पायी फिरावे लागले. अखेर दुपारी २.१५ च्या सुमारास मुकुंदवाडी भागातील जयभवानी चौकात तनि्ही आरोपींना पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे, पोलिस उपनिरीक्षक अजयकुमार पांडे, रमेश सांगळे, संजय रोकडे, सुनील म्हस्के, भगवान जगताप, बाळासाहेब आंधळे, अनिल तुपे, सय्यद शकील, संतोष लोंढे यांच्या पथकाने बनावट सोन्यासह अटक केली.