आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेबाइलचे लाखांचे बनावट सुटे भाग जप्त, क्रांती चाैक पाेलिसांची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आयफोन, बिट्स कंपनीच्या मोबाइल संचाच्या बनावट सुट्या भागांची विक्री करणाऱ्या तिघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या तिघांकडून लाख हजारांचे मोबाइलचे बनावट सुटे भाग जप्त करण्यात आले असून तिघांवर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रोटेक्ट आयपीएलएलपी येथे कार्यरत कुंदनसिंग किशनसिंग कहाटे (३९,अजंठा हाउसिंग सोसायटी) सुजित सुरेश खंडाळे यांना अॅपल बिट्स कंपनीच्या मोबाइलच्या बनावट सुट्या भागांची विक्री होतेय का, याची खातरजमा करण्यास सांगण्यात आले होते. कहाटे आणि खंडागळे यांनी क्रांती चौक पोलिसांच्या मदतीने २५ ऑक्टोबर रोजी शहरातील चामुंडा मोबाइल शॉपी, न्यू चामुंडा मोबाइल शॉपी, रॉक्सी टॉकीजसमोर, तर नाइस मोबाइल शॉपी दलालवाडी या दुकानावर दोन पंचांसमक्ष छापा मारला. तिथे ॲपल बिट््स कंपनीच्या बनावट सुट्या भागांची विक्री होत असल्याचे आढळले. या सर्व दुकानांतून ७२८ बनावट सुटे भाग असे जवळपास लाख हजार ९०९ रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी आरोपी जयराम जोईताजी चौधरी (पैठणगेट), प्रबताराम नरसाराम चौधरी (पैठण गेट), मोहंमह समीर मो. हनीफ हलाली (रा. फाजलपुरा ) यांच्यावर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मिसाळ करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...