आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम-रावणाचे युद्ध आज रंगणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- बजाजनगरात रामलीला मैदानावर प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही दसर्‍याच्या दिवशी सायंकाळी महाकाय दशमुखी रावणासोबत मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचे घनघोर युद्ध रामलीला मैदानावर होणार आहे. त्यानंतर तब्बल 45 फूट उंची असलेल्या दशानन रावणाचे दहन होणार आहे. त्यासाठी व्यवस्थापकांकडून जोरदार तयारी सुरू आहे.

धर्मप्रचारक रामायण मंडळ
मूळ काशी (उत्तर प्रदेश) येथून आलेल्या 30 कलाकारांचा संच रामलीला मैदानावर नवरात्रोत्सवादरम्यान दररोज रात्री 8 ते 10 या वेळेत रामायणाचे सादरीकरण करत आहे. त्यात सीतास्वयंवर, लक्ष्मणकोप, राम वनवास, हनुमान भेट, वानरसेना, राम-रावण युद्ध अशा अनेक दृश्यांतून रामायण सादर करण्यात आले.

45 फूट रावणाचे कुतूहल
रावणाचे भव्यदिव्य रूप पाहण्यासाठी दरवर्षी रामलीला मैदानावर गर्दी होते. हिंदी सांस्कृतिक मंच, श्रीराम जानकी प्रतिष्ठानच्या वतीने 45 ते 50 फूट उंचीची रावणमूर्ती तयार करण्यात आली आहे.

रावण निर्मितीचे काम पूर्णत्वाकडे
रावण निर्मितीचे काम रामलीला मैदानात उत्तर प्रदेशातील तानपूर, (जि.बुलंदशहर) येथील चांदभाई व सहकारी मोठय़ा जिकिरीने करतात
वाळूजसोबतच शहरातील एन-7 परिसरातील रावण तयार करण्याचे काम चांदभाईच करत आहेत. त्यांचा हा पिढीजात व्यवसाय असल्याचे त्यांनी सांगितले.
रावण निर्मिती पूर्ण झाल्यानंतर त्यास वस्त्रे चढवली जातात. त्यात भिन्न-भिन्न प्रकारचे फटाके बसवले जातात.