आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • E Diwali By Shri Swami Samarath Seva Adhyatmik Vikas Center

येथे मिळतील मोफत फटाके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तोच बॉम्ब , तीच सुरसुरी सोबत भूचक्र आणि फुलझाडही..कानठळ्या न बसवणारा आवाज पण बॉम्ब फोडल्याचा.आवाज आणि अनुभवदेखील... महत्त्वाचे म्हणजे हे सर्व मोफत आणि प्रदूषणविरहत. ही कोणतेही सरकारी योजना नाही वा जादूचा प्रयोगही नाही. श्री. स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्राने (दिंडोरी प्रणीत) नव्यापिढीची आवड ओळखून तरुण पिढीसाठी खास ई- दिवाळी फटाक्यांचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यामुळे प्रदूषण करणारे महागडे फटाके फोडण्याऐवजी संगणक आणि लॅपटॉपवरच फटाके फोडणे शक्य होत आहे. केंद्राच्यावतीने याचे मोफत वितरण सुरू आहे. डीबी स्टारने गेल्यावर्षी या उपक्रमाची माहिती दिली होती. राज्यभरात ई-फटाक्यांना प्रतिसाद वाढला आहे. याची व्याप्ती वाढवण्यासाठी युवकांनी आता शाळा, महाविद्यालयामध्ये कार्यशाळा सुरू केल्या आहेत.

दिवाळी म्हटले की कानठळ्या बसवणारे फटाक्यांचे आवाज, नाकातोंडात जाणारा धूर, धुराने झाकोळलेले आसमंत आणि फटाक्याच्या कच-याने भरलेले रस्ते, हे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. फटाक्याच्या प्रदूषणामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते. हे प्रकार टाळण्यासाठी दिंडोरीप्रणीत स्वामी समर्थ केंद्राने दिंडोरी येथे संगणकावर फटाके फोडण्याचे हायटेक ई-दिवाळी हे सॉफ्टवेअर तयार केले आहे. या विकास केंद्राचे बारा विभाग चालतात. यापैकी पर्यावरण व प्रकृती विभाग हा एक आहे. या विभागाच्या आयटी तंत्रज्ञ सेवेकºयांनी दिवाळीसाठी हे सॉफ्टवेअर तयार केले आहे.

अशी साजरी करा ई-दिवाळी
केंद्राची www.dindoripranit.org ही वेबसाइट आहे. याच्या दर्शनी पानावरच ई-दिवाळीची लिंक आहे. त्यावर क्लिक करताच हे सॉफ्टवेअर उघडते. तेथे सुतळी बॉम्ब, रॉकेट, सुरसुरी, चक्र, झाड, लड, डबल शॉट यासारखे दहा फटाके आहेत. माऊसच्या साहाय्याने उदबत्ती हव्या त्या फटाक्याच्या वातीला लावून हे फटाके फोडता येतात. खºयाखुºया फटाक्याप्रमाणे आवाज होऊन तो फुटतो. अर्थात संगणकाच्या स्पीकरएवढाच त्याचा आवाज येतो. सॉफ्टवेअर चालवणे अगदी सोपे असून लहान मुलांनाही ते शक्य होते. संगणकाच्या गेमप्रमाणेच याची मजा अनुभवता येते. घर बसल्याविनासायास कोणालाही त्रास न होता. फटाक्यांची मजा घेता येते.

मोफत वाटपही सुरू
हे सॉफ्टवेअर मिळवण्यासाठी अनेक मार्ग आहेत. www.dindoripranit.org वेबसाइटवर भेट दिल्यास ई-दिवाळी हे ऑप्शन दिसते. त्यावर क्लिक करताच हे सॉफ्टवेअर डाऊनलोड होण्यास सुरुवात होते. दिंडोरीप्रणीत केंद्राचे हडको एन-9 , गारखेडा, शिवाजीनगर, विठ्ठलनगर, समर्थनगर, बन्सीलालनगर आणि बजाजनगर येथील केंद्रात या सॉफ्टवेअरचे मोफत वितरण सुरू आहे. या प्रत्येक केंद्रात दिवसभर स्वयंसेकांकडून पेन ड्राइव्ह किंवा सीडीत हे सॉफ्टवेअर मोफत कॉपी करून दिले जात आहे. सॉफ्टवेअरसाठी स्वामी समर्थ केंद्रात प्रत्यक्ष किंवा शशी पाटील यांना 9922611112 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.