आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- वेगाने बदलणार्या तंत्रज्ञानाच्या युगात ई- लर्निंग ही काळाजी गरज बनली आहे. हीच गरज लक्षात घेऊन माँटेसरी शिक्षण संस्थेने एक पाऊल पुढे टाकले आहे. शाळेत पहिली पासून दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. संस्थेने त्यासाठी विकास प्रकाशनचे नवनीत सॉफ्टवेअर घेतले असल्याची माहिती मुख्याध्यापिका यू.व्ही.काळे यांनी दिली.
ई-लर्निंगसाठी संस्थेने स्वतंत्र हॉल तयार केला आहे. विज्ञान, गणित, भूगोल, पर्यावरण, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, संस्कृत आदी विषयांतील विविध संकल्पना याद्वारे स्पष्ट केल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना किचकट वाटणारे विषय सोप्या पद्धतीने शिकवले जातील. चलचित्राच्या माध्यमातून या विषयांतील मूलभूत संकल्पना स्पष्ट होणार आहेत. मराठी आणि सेमी-इंग्रजी या दोन्ही माध्यमांच्या अभ्यासक्रमाचा यात समावेश करण्यात आला आहे.
असा असेल ई-लर्निंग हॉल
ई-लर्निंग हॉल हा 400 चौरस फुटांचा आहे. यात एकावेळी 100 विद्यार्थी बसू शकतात. संस्थेने यासाठी 2 लाख रुपये खर्च केले आहे. हॉलमध्ये 10 बाय 10 ची स्क्रीन बसवण्यात आली आहे. प्रोजेक्टरद्वारे तेथे अध्यापन केले जाईल. त्यासाठी 24 शिक्षकांना प्रशिक्षण देऊन ई-लर्निंगची कार्यपद्धती समजावून सांगण्यात आली आहे. तासिकेअंतर्गत विविध विषयांबद्दल मार्गदर्शन केले जाईल.
संस्थेतील वरिष्ठांचा असेल सहभाग
संस्थेचे अध्यक्ष म.ह.सावजी, उपाध्यक्ष डॉ. बी.बी.पाटील, सचिव अँड. राम मालाणी, कोशाध्यक्ष गिरीश सावजी, मुख्याध्यापिका यू.व्ही.काळे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी गोसावी या उपक्रमामध्ये सहभागी होऊन काम पाहत आहेत.
अशी होणार मदत
संस्कृत व मराठी भाषेतील व्याकरण शिकवण्यासाठी सोपी पद्धती
जीवशास्त्रात डोळ्यांची रचना व कार्यपद्धती, केंद्रक, रक्तप्रवाह, हृदयाचे कार्य आदींची माहिती
गणितातील विविध संकल्पना चित्रांच्या माध्यमातून समजावून सांगण्यात येणार
भूगोल - नद्या, पर्वत, खनिजसंपत्ती, भूरूपे, ज्वालामुखी, ग्रह-तार्यांचे परिवलन, परिभ्रमण, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण
विद्यार्थ्यांना पाहण्याची संधी
इतिहास - कोलंबस भारतात कसा आला त्याचा मार्ग, नकाशा अशा प्रकारची रंजक माहिती या माध्यमातून देण्यात येते.
ई-लर्निंगद्वारे विद्यार्थ्यांना विज्ञानासारखे अवघड विषय सोपे करून शिकवले जातात.
शुक्रवारी उद्घाटन
या ई-लर्निंग हॉलचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते शुक्रवारी (8 फे ब्रुवारी) सकाळी 10.30 वाजता होणार आहे.
संकल्पना सोप्या पद्धतीने समजावण्यासाठी उपयोगी
विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयातील अवघड संकल्पना प्रोजेक्टरच्या माध्यमातून अधिक सोप्या पद्धतीने समजावून सांगितल्या जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हे माध्यम अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
-यू.व्ही.काळे, मुख्याध्यापिका
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.