आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक वॉर्डासाठी ५० लाख रुपये, कामांसाठी निधी मिळाल्याने चर्चेला नगरसेवकांची बगल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अब्जावधींच्या खुल्या जागांवर चर्चा सुरू असताना नगरसेवक मांडत असलेले मुद्दे ऐकून आयुक्त बकोरिया यांचे हात आपोआप जोडले गेले. - Divya Marathi
अब्जावधींच्या खुल्या जागांवर चर्चा सुरू असताना नगरसेवक मांडत असलेले मुद्दे ऐकून आयुक्त बकोरिया यांचे हात आपोआप जोडले गेले.
औरंगाबाद - सगळ्या नगरसेवकांना त्यांच्या वाॅर्डांसाठी सरासरी ५० लाख रुपयांच्या कामांची तरतूद केल्याने आज बजेटवरील सर्वसाधारण सभेत कोणीच चर्चा केली नाही आणि २० मिनिटांत ३० कोटी रुपयांची कामे वाढवत सर्वसाधारण सभेने अर्थसंकल्प मंजूर केला. नवीन वाढीत साताऱ्यासाठी दहा कोटी रुपये, महापौरांच्या आपत्कालीन निधीसाठी १० कोटी ज्यांना कमी निधी मिळाला असे वाटते अशा नगरसेवकांच्या वाॅर्डांत कामे व्हावीत यासाठी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर २०१६-२०१७ या आर्थिक वर्षाचे बजेट स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात यांनी मांडले. या अर्थसंकल्पावर, शहराच्या समतोल विकासावर चर्चा होता महापौरांकडे सर्वाधिकार देऊन बजेट मंजूर केले जाईल, असे वृत्त आज ‘दिव्य मराठी’ने दिले होते. त्यानुसारच घडले. उलट अवघ्या २० मिनिटांत कसलीही धोरणात्मक चर्चा करता बजेट मंजूर करण्याचा नवीन पायंडा पाडण्यात आला.
थोरातांनी बजेट सादर करताच शिवसेनेचे गटनेते राजू वैद्य यांनी हे बजेट सर्वांना विश्वासात घेऊन त्यांचा विचार करून तयार करण्यात आल्याचे सांगत महापौरांचा दहा कोटींचा आकस्मिक निधी ठेवावा तो आकस्मिक कामांना वापरावा, अशी सूचना करत चर्चा करता अर्थसंकल्प मंजूर करावा, असे म्हटले. त्यामुळे उद्यापासून कामांच्या बाबतीत कार्यवाही सुरू करता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

भाजपचे राज वानखेडे यांनी मागच्या वर्षी लोकांना भूलथापा द्याव्या लागल्याचे सांगत बजेटमधल्या कामांचे लगोलग अंदाजपत्रक करून ते काम मार्गी लागेल याची खात्री द्यावी, अशी मागणी केली. त्याला गजानन बारवाल जहांगीर खान यांनीही होकार दिला.
मात्र, जफर बिल्डर काँग्रेसच्या नगरसेवकांनी आपल्या वाॅर्डांना फक्त २५ लाखांची तरतूद केल्याचे सांगत अन्याय झाल्याचा आरोप केला. इतरांना ५० लाखांची तरतूद दिली जात असताना आम्हाला एवढी कमी तरतूद कशासाठी, असा सवाल करत त्यांनी महापौरांच्या समोर ठिय्या दिला. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत महापौरांनी या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या झालेल्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच सातारा देवळाई या भागाच्या विकासासाठी १० कोटी रुपये, महापौर आकस्मिक निधीसाठी दहा कोटी, तर ज्यांना कमी तरतूद मिळाली आहे अशांसाठी कोटी अशी तरतूद करत सुधारणांसह अर्थसंकल्प मंजूर केल्याची घोषणा केली.

पुढे वाचा... चर्चा केलीच पाहिजे, असा नियम नाही, सर्वांना न्याय