आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कीटकनाशकमुक्त भाजीपाला खा, शंभर वर्षे जगा! शेतकर्‍याला सलाम, तोट्यातील शेती आणली नफ्यात!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वांगे - Divya Marathi
वांगे
कन्नड- आरोग्याबाबत आता प्रत्येकजण जागरूक झाला आहे. नागरिक खाद्यपदार्थ शुद्ध असल्याची खात्री करूनच घेतात. मात्र, भाजीपाला कीटकनाशकमुक्त असेल याची खात्री काय? शेतकरी जास्त उत्पन्न येण्यासाठी भरमसाठ कीटकनाशक फवारतो. औरंगाबाद शहराजवळील भागातील शेतकरी नाल्यातील पाण्यावर भाजीपाला पिकवितो, जो अतिशय घातक आहे. हाच भाजीपाला मॉलमध्ये अतिशय टवटवीत दिसतो. शहरी लोकांना मात्र माॅलमधील हाच भाजीपाला दर्जेदार वाटतो.

यातून मोठी हानी होत आहे. कॅन्सर, नपुंसकता, मूत्रपिंड निकामी होणे, डोळ्याची नजर कमी होणे, अकाली वृद्धत्त्व, अशा व्याधी विषारी भाजीपाला खाल्ल्याने होत आहे. लहान मुलांचे भविष्य अंधारात आहे. लोक सध्या रामदेवबाबाचे प्रॉडक्ट वापरत आहे. तेल, मसालाही शुद्ध मिळतोय, पण भाजीपाला विषारी खात आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये दिवसेंदिवस गर्दी वाढत चालली आहे.

कन्नड येथील शेतकरी अजय जाधव यांनी दहा एकर जमिनीत कुठल्याही रासायनिक कीटकनाशकाचा व खताचा वापर न मेथीचीभा जी, करडीची भाजी, डांगर, दुधी भोपळा, मूग, निंबू, कांदा, पपई, वालाच्या शेंगा, गीलके, दोडके, कारले, पुदीना यासह 110 प्रकारचा भाजीपाला पिकविला आहे. शेतात दहा मधपेट्या ठेवलेल्या असल्याने परागीभवन होऊन अतिशय शुद्ध भाजीपाला पिकत आहे. कीटकनाशकाचा वापर होत असलेल्या शेतात मधमाशा थांबत नाहीत किंवा मृत्युमुखी पडतात. मात्र, जाधव यांच्या शेतात दहा मधपेट्या आहेत व पेट्याची संख्याही वाढत आहे.

'रासायनिक खते न दिल्याने भाजीपाल्याचे उत्पन्न कमी होते. मात्र, विषमुक्त भाजीपाल्याला भाव दुप्पट मिळतो.'
- अजय जाधव शेतकरी आठेगाव खेडा, ता.कन्नड, जि.औरंगाबाद. मो.क्र.9028526526

पुढील स्लाइडवर पाहा...  प्रगतीशील शेतकरी अजय जाधव यांच्या शेतीचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...