आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इबोलाची धास्ती; १५०० प्रवाशांची केली तपासणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - इबोलाच्याधास्तीने आरोग्ययंत्रणा सज्ज झाली असून विमानतळावर एक अॅम्ब्युलन्स तैनात करण्यात आली आहे. येणाऱ्या प्रवाशांची तपासणीही केली जात आहे. आतापर्यंत औरंगाबाद विमानतळावर १५०० प्रवाशांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एकातही इबोलाची लक्षणे आढळलेली नाहीत. दरम्यान, मनपाने विद्यापीठ मौलाना आझाद महाविद्यालयात शिकणाऱ्या आफ्रिकन विद्यार्थ्यांचा तपशील मागवला असून त्यांनी सध्यातरी आिफ्रकन विद्यार्थ्यांनी त्या देशांत जाऊ नये, असे आवाहन केले आहे.
आतापर्यंत अडीचशेहून अधिक बळी घेणाऱ्या इबोला या तापाने जगभरात भीतीचे वातावरण पसरले असून पश्चिम आफ्रिकेतील गिनी, सिएरा लिओन, नायजेरिया या देशांत सर्वािधक बळी गेले आहेत. अतशिय वेगात पसरणारा हा ताप प्राणघातक असून आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून त्याचा भारतात शिरकाव होऊ नये यासाठी पुरेपूर दक्षता घेतली जात आहे. याशिवाय खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर येणाऱ्या, विशेषकरून वदिेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत १५०० प्रवाशांची तपासणी करण्यात आली असून एकाही प्रवाशात इबोलाची लक्षणे आढळली नसल्याचे सिव्हिल सर्जन डॉ. जी. एम. गायकवाड यांनी सांगितले.

मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या टाकळीकर म्हणाल्या की, विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक विमानाच्या वेळी १०८ क्रमांकाच्या सेवेची अॅम्ब्युलन्स आणि डॉक्टरांचे पथक हजर असते. आिफ्रकन देशांतून आलेल्या प्रवाशांची तपासणी केली जात असून त्यांची यादी आरोग्य विभाग सगळीकडे देत आहे. तपासणीत लक्षणे आढळली नाहीत, तरी पुढील २४ दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवले जाते. आतापर्यंत मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील रेणापूरच्या एका व्यक्तीचे नाव यादीत आले आहे. त्यावर लातूरचे वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहेत. दुसरीकडे घाटीत पाच खाटांचा विशेष कक्ष तयार ठेवण्यात आला अाहे.
दुसरीकडे मनपाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि मौलाना आझाद महाविद्यालय यांना पत्र पाठवून आफ्रिकन विद्यार्थ्यांची माहिती मागवली आहे. विद्यापीठाने या पत्राला उत्तर देत ८० आफ्रिकन विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे कळवले आहे. त्यांना आगामी काळात मायदेशी जाण्याचे आवाहन करण्यात आल्याचे डॉ. टाकळीकर म्हणाल्या. या रोगात अचानक ताप येतो. थकवा येतो, याशविाय स्नायू दुखणे तसेच घसा सुजणे ही लक्षणे दिसून येतात. दुसऱ्या टप्प्ययात उलट्या जुलाब होतात. अंगावर पुरळही येते. मुत्रपिंड तसेच यकृताचे कार्य बिघडते. काही रुग्णांमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव होतो. या रोगामध्ये रुग्ण मरण्याचे प्रमाण ९० टक्के इतके आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.