आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इबोला तपासणीचा बोलबाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जगात इबोला या रोगाची दहशत पसरली असताना शहरातील आरोग्य विभाग मात्र याबाबत ल बिलकूल गंभीर नाही. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांमध्ये इबोलाचा संशयित रुग्ण असण्याची शक्यता असल्याने त्यांना रोखण्यासाठी दोन दविसांपासून जम्बो मोहीम राबवली जात असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला. तो किती पोकळ आहे हे गुरुवारी "दवि्य मराठी'ने केलेल्या पाहणीत सदि्ध झाले. इंडियन एअरलाइन्सचे दुपारी चार वाजता येणारे विमान औरंगाबादला आले, तरी विमानतळावर तपासणी करणारा एकही अधिकारी अथवा कर्मचारी तेथे नसल्याचे आढळले. दुसरीकडे जवळपास २० परदेशी प्रवासी विनातपासणी शहरात दाखल झाले.
इबोलाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र हायअर्लट करण्यात आला आहे. विशेषत: परदेशी नागरिकांची तपासणी केली जात आहे. शहरात मात्र याकडे सपशेलपणे दुर्लक्ष केले जात आहे. १९ ऑगस्ट रोजी १५०० प्रवाशांची तपासणी केल्याचा दावा आरोग्य विभागाने केला; परंतु प्रत्यक्ष स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी "दवि्य मराठी'च्या प्रतिनिधीने विमानतळावर दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाहणी केली. यादरम्यान येथे आरोग्य विभागाचा एकही अधिकारी अथवा कर्मचारी दिसला नाही. शविाय आवश्यक ती यंत्रणा व अॅम्बुलन्सही नव्हती.
NAअसे उघडे पडले पितळ
विमानतळावर तपासणी करणारे पथक दसित नसल्याने दुपारी २ वाजेच्या सुमारास प्रतिनिधीने िजल्हा अाराेग्य अधिकारी डॉ. जी. एम. गायकवाड यांना फोन केला. तपासणी पथकाबाबत विचारणा केली असता डॉ. हर्षल कोठारी, डॉ. गौरव शेळके आणि डॉ. शंकर चौधरी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये कामाला असल्याचे त्यांनी सांगितले. दुपारी ४ वाजता विमान आल्यावर पुन्हा फोन करून पथक दिसत नसल्याचे डॉ. गायकवाड यांना कळवले. त्यांनी पथकातील एका डॉक्टरला फोन करून तत्काळ विमानतळ गाठण्याचे आदेश दिले. त्यानंतर ३० िमनिटांनी म्हणजेच ४.३० वाजता डॉ. कोठारी तेथे आले, परंतु तोपर्यंत विमानातील प्रवासी जिकडे-तिकडे गेले होते.
अपुरी यंत्रणा अन् डॉक्टरांची तारांबळ
इबोलाच्या संशयितांची तपासणी करण्याच्या दृष्टीने पथकाकडे एक अॅम्बुलन्स आणि आवश्यक यंत्रणा विमानतळावर तैनात असणे अावश्यक असते; पण गुरुवारी तेथे अॅम्बुलन्स आढळली नाही. प्रवासी निघून गेल्यावर ४.३० वाजता डॉक्टर अॅम्बुलन्स घेऊन आले. मात्र, उशिरा दाखल होण्याचे योग्य कारण ते देऊ शकले नाहीत. प्रवाशांची तपासणी करण्यासाठी आल्याचे त्यांच्याकडे पाहून वाटत नव्हते. कारण अॅप्रन घातलेला नव्हता व मास्कही लावलेला नव्हता. प्रतिनिधीने विचारल्यानंतर भांबावून डॉक्टर खिसे चाचपडत होते.
१५०० प्रवासी तपासलेच कसे?
विमानतळावर १४ ते १९ ऑगस्टदरम्यान १५०० प्रवासी तपासल्याचा दावा आरोग्य विभागाने केला होता. प्रत्यक्षात मात्र पथकातील डॉक्टरने म्हटल्याप्रमाणे उलटी, ताप, खोकला, चक्कर येणाऱ्या प्रवाशांची किंवा विमानतळावर लावलेल्या टेबलपर्यंत येणाऱ्यांची तपासणी पथकाद्वारे करण्यात येते. शविाय दुपारी चार वाजता पथक नसल्याने मुंबईहून आलेल्या एकाही प्रवाशाची तपासणी झाली नाही, तर ४.३० वाजता दिल्लीहून आलेला एकही प्रवासी तपासणी पथकाच्या टेबलपर्यंत गेला नाही. त्यामुळे १५०० प्रवाशांची तपासणी झाली कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.