आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eco Friendly Gandesh News In Marathi, Aurangabad, Divya Marathi

औरंगाबादेत ५५ हजार मूर्तींची विक्री, कळली पर्यावरणाची महती, घरी शाडूचे गणपती!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- निसर्गाची जपणूक तसेच प्रदूषणविरहित गणेशोत्सव साजरा करण्याच्या हेतूने दैनिक "दिव्य मराठी'ने केलेल्या घरोघरी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या आवाहनाला मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत शाडू मूर्तींच्या विक्रीत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली असून हजारे कुटुंबांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा "श्रीगणेशा' केला आहे.

गेला महिनाभर "दिव्य मराठी'सह विविध संस्था, संघटनांकडून गणेशोत्सवात पर्यावरण संतुलनाचे भान राखण्याचे आवाहन केले जात होते. औरंगाबाद शहरात सुमारे ५५ हजार घरांमध्ये शाडूच्या गणरायाची स्थापना झाली आहे.
निसर्गाची जपणूक
प्लास्टरऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे पावित्र्य भंग होतेच, शिवाय पर्यावरणाच्या संतुलनावरही परिणाम होतो. त्यामुळे भक्तांनी तसेच गणेश मंडळांनी शाडूच्या मूर्ती खरेदी कराव्यात, असे आवाहन "दिव्य मराठी'सह पर्यावरणप्रेमींकडून अनेक वर्षांपासून केले जात होते.

अशी वाढली संख्या
औरंगाबाद५५००० २५,०००
जळगाव ३८०० २५००
नाशिक ३,००० २,०००
सोलापूर ५०० २००
अकोला २,८०० -
अमरावती ३,२०० -

>इको-फ्रेंडली
मूर्ती नेमकी कशी तयार करावी, याची अनेकांना माहिती नव्हती. तसेच शाडूची मूर्ती भंग पावते असाही प्रचार केला जात होता. त्यामुळे कलावंत, सामाजिक कार्यकर्त्यांनी मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळा सुरू केल्या. यात "दिव्य मराठी'नेही पुढाकार घेतला होता.
>दिव्य मराठी, सामाजिक-पर्यावरण संस्थांच्या आवाहनाला प्रतिसाद, औरंगाबादेत ५५ हजार मूर्तींची विक्री

>कार्य"शाळा' : यंदाशाळांत मूर्ती निर्मितीच्या कार्यशाळा झाल्या. आमच्या घरी शाडूचीच मूर्ती स्थापन करणार अशी शपथ मुलांनी घेत ती अंमलातही आणली.